देवाज् ग्रुपच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवाज् ग्रुपच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

अहमदनगर प्रतिनिधी -  सालाबाद प्रमाणे याही वर्षी देवाज् ग्रुप च्या वतीने कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त सर्व

विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे
तुळजाभवानी देवीचा पलंगाचे नगर शहरात आगमन
श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले

अहमदनगर प्रतिनिधी – 

सालाबाद प्रमाणे याही वर्षी देवाज् ग्रुप च्या वतीने कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त सर्व धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देत शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची स्थापन करून घट स्थापना केली 

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते परंतु यावर्षी कोरोणाचे महाभयंकर संकट असल्यामुळे साध्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन नागरिकांना निरोगी व सुदृढ आरोग्य लाभो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

देवाज् ग्रुपच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात देवीची महाआरती करताना आमदार संग्राम जगताप समवेत संस्थापक अध्यक्ष नगरसेवक स्वप्निल शिंदे,सभापती अविनाश घुले,मा.महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,नगरसेविका पल्लवी जाधव,सचिन शिंदे,सचिन जगताप,विवेक नाईक,आप्पा हरबा,आमित गटने,निलेश सत्रे,गजेंद्र भांडवलकर,दादा दरेकर,जय भोसले,जय पारधे,महेश कुरे,ऋषिकेश देशमुख,सुरज कुरलीये,रोनीत कोतकर आदी उपस्थित होते.

COMMENTS