तिसर्‍या लाटेत मुलांबाबत सावध राहिले पाहिजे ; मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिसर्‍या लाटेत मुलांबाबत सावध राहिले पाहिजे ; मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे.

 शहरटाकळी येथे बंद व रास्ता रोको
शाईचा सरकारने घेतला धसका
नीरज चोप्राने घेतला रौप्यपदकाचा वेध

मुंबई / प्रतिनिधी: कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोगतज्ज्ञांच्या कृती दलाशी संवाद साधला. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत, तसेच ती आल्यास लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज व्यक्त होत आहेत; मात्र आपण सावध राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राज्या कोरोना विषाणूविरुद्ध लढाई लढत आहे. त्या लढाईत आपल्याला जरी पूर्ण यश मिळाले नसले, तरीदेखील आपण राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, की या लढाईतील हे यश डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे आहे आणि मी त्यात निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या साखळीप्रमाणे आपणही आपली एक घट्ट साखळी तयार करू आणि एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करु, असे सांगतानाच घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या ’माझा डॉक्टर’ अर्थात फॅमिली डॉक्टरांना आपल्या मुलाला वेळीच दाखवा. असे केल्याने लगेचच उपचार सुरू होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ’माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. राज्यात आलेल्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर दुसर्‍या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. संसर्गाचे वय खाली येत असल्याने आता तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. लहान मुलांवर उपचार करत असताना काय करावे आणि काय करू नये हे डॉक्टरांकडून समजून घेतले पाहिजे. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांवर डोळे झाकून विश्‍वास ठेवतो. ते सांगतील, ते उपचार आपण घेतो; मात्र हे करत असताना रोगापेक्षा उपचार भयानक होऊ नये, याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे.

COMMENTS