तांत्रिक बिघाडामुळे कोसळले वायुसेनेचे ड्रोन

Homeताज्या बातम्यादेश

तांत्रिक बिघाडामुळे कोसळले वायुसेनेचे ड्रोन

गुरदासपूर : पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात आज, बुधवारी वायुसेनेचे एक ड्रोन तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश वायुद

‘अकोला पश्‍चिम’ची पोटनिवडणूक रद्द !
जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू
महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार

गुरदासपूर : पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात आज, बुधवारी वायुसेनेचे एक ड्रोन तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश वायुदलाने जारी केले आहेत.
वायुदलाच्या जम्मूतील तळाचे हे ड्रोन असून, ते खानोवाल गावातील धानाच्या शेतात कोसळले. अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनच्या माध्यमातून टिफिन बॉम्ब टाकण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी वायुदलाच्या ड्रोनला हा अपघात झाला. या घटनेनंतर पंजाब पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आकाशात 10 ते 15 मिनिटे घिरट्या घातल्यानंतर एक ड्रोन कलानौर उपविभागातील एका गावात कोसळल्याची माहिती गुरदासपूरचे पोलिस अधीक्षक नानकसिंग यांना मिळाली. त्यानंतर नानकसिंग यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. कोसळलेले ड्रोन पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि अफवा पसरण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी वेळीच कारवाई करीत लोकांना घटनास्थळावरून हटवून अफवांना बळी पडू नका, असे आवाहन परिसरात केले. त्यानंतर वायुदलाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले.

COMMENTS