Homeताज्या बातम्या

नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू

भोपाळ : नामिबियातून 22 डिसेंबर 2022 रोजी भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी एक मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या चित्त्याचा मृत्यू किडनीच्या आजारामु

स्वीपद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत
गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अंजली मुळे
गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.

भोपाळ : नामिबियातून 22 डिसेंबर 2022 रोजी भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी एक मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या चित्त्याचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाल्याची माहिती पुढे आली. याबाबत मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाने लेखी निवेदन जारी केले.
या प्रसिद्धीपत्राकानुसार नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेली ‘शाशा’ नामक मादा चित्ता सुस्तावस्थेत आढळून आला. निरीक्षण पथकाला असे वाटले की ’शाशा’ला तातबडतोब उपचारांची गरज आहे. त्यानुसार तिला क्वारंटाइन क्षेत्रात आणण्यात आले. यानंतर तिच्या रिक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये धक्कादाक बाब समोर आली ती म्हणजे शाशाच्या किडनीला संसर्ग झाला होता. पण तिला भारतात आणण्यापूर्वीच संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शाशाची मेडिकल हिस्ट्री देखील तपासण्यात आली, यामध्ये असे आढळून आले की, 15 ऑगस्ट 2022 रोजी नामिबियात तिची शेवटची रक्ताची चाचणी करण्यात आली यामध्ये रक्तात क्रियेटिनिनचे प्रमाण 400 पेक्षा अधिक आढळून आले होते. यामुळं हे स्पष्ट झाले की, शाशाला किडनीचा आजार हा भारतात आणण्यापूर्वीच जडला होता. पण डॉक्टरांकडून शाशाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करुनही अपयश हाती आले. सोमवारी 27 मार्च 2023 रोजी अखेर तिचा मृत्यू झाला. नामिबियातून पहिल्या खेपेत भारतात आणण्यात आलेल्या उर्वरित 7 चित्त्यांमध्ये 3 नर आणि 1 मादी खुल्या जंगलामध्ये स्वच्छंदी विहार करत आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम असून ते सामान्यपणे शिकारही करत आहेत. तसेच दुसर्‍या खेपेत दक्षिण अफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असून त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे.

COMMENTS