… तर याद राखा… तालिबानचा अमेरिकेला कडक शब्दात इशारा…

Homeताज्या बातम्याविदेश

… तर याद राखा… तालिबानचा अमेरिकेला कडक शब्दात इशारा…

वेब टीम : दोहा तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिकेत कतारची राजधानी दोहा येथे चर्चा झाली.  या चर्चेदरम्

आंबेजोगाईत सहा जणांचा मृत्यू ; नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय प्रशासन असहमत
पाच हजार रुपयांसाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मारले …. | LOKNews24
महाराष्ट्राची स्वातंत्र्य गाथा मोठ्या पडद्यावर |

वेब टीम : दोहा

तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिकेत कतारची राजधानी दोहा येथे चर्चा झाली. 

या चर्चेदरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अमेरिकेला इशारा दिला की ‘अफगाणिस्तानमधील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका.’

तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे तालिबानना सत्ता सोडावी लागली होती. 

त्यामुळे, अमेरिका पुन्हा तसा प्रयत्न करू शकते, अशी भीती तालिबानला आहे. दोहामधील चर्चेची माहिती देताना तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी म्हणालेत की ‘अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध असणे हे सर्वांसाठी चांगल असेल. 

अफगाणिस्तानमधील सध्याचे सरकार कमकुवत करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नये अन्यथा, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील.’ असे आम्ही अमेरिकेला बजावले आहे.

“दोन्ही देशांचे एकमेकांशी चांगले संबंध राहतील, असे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. अफगाणिस्तान अतिशय कठीण काळातून जात असताना संयम बाळगण आवश्यक आहे. 

संयम बाळगल्यास अफगाणिस्तान अधिक सामर्थ्याने या कठीण स्थितीतून बाहेर निघेल.” अस मुत्ताकी म्हणालेत.

COMMENTS