तरुणांनी गांधीजींच्या विचाराने भारताच्या समृध्द प्रगतीसाठी योगदान द्यावे – श्री.थानेदार  

Homeताज्या बातम्याअहमदनगर

तरुणांनी गांधीजींच्या विचाराने भारताच्या समृध्द प्रगतीसाठी योगदान द्यावे – श्री.थानेदार  

संगमनेर ( प्रतिनिधी ) जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते.भारत हा तरु

वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
मंदा आरोटे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी ः विजयराव चौधरी
श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश



संगमनेर ( प्रतिनिधी )

जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते.भारत हा तरुणांचा देश असून मागील 75 वर्षांत झालेली प्रगती आनंददायी आहे. भारत महासत्ता बनविण्यासाठी देशातील तरुणांनी गांधीजींच्या विचारातून समृध्द खेडी निर्माण करत भारताच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन अमेरिकेतील विचारवंत व खा.श्री.थानेदार यांनी केले आहे.
जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित दुसर्‍या ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्समध्ये जागतिक शांतता सुसंवाद व प्रगती या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजीत तांबे, उत्कर्षा रुपवते,मिलींद औटी,गणेश गुंजाळ,नामदेव गुंजाळ,तुषार गायकर,अर्चना बालोडे,प्रा.बाबा खरात,अभय जोंधळे,चांगदेव खेमनर आदि उपस्थित होते.  


 या चर्चासत्रात बोलताना अमेरीकेचे राजकीय नेते श्री.थानेदार म्हणाले की, महात्मा गांधी यांचा देश असलेल्या भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या आहेत.भारताने मागील 75 वर्षात चांगली प्रगती केली असून आगामी 50 वर्षात राष्ट्रीय एकात्मता जपत काम केले पाहिजे.येणारे दशक हे माहिती तंत्र-ाानाचे असून तरुणांनी गांधीजींच्या विचारातून खेडी समृध्द करत देश प्रगतीशील व महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे. जाती पाती व भेदभावाचे राजकारण थांबविण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा राहणार आहे.
अमेरिकेच्या श्रीमती लथा मांगीपुडी म्हणाल्या कि, महात्मा गांधी हे फक्त एका देशापुरते नसून ते जगाचे आहेत त्यांनी दक्षिण आफ्रिके मधून केलेली सुरुवात भारतामध्ये पोहोचली आणि भारत आज शांततेचा पुरस्कर्ता म्हणून जागतिक पातळीवर उभा आहे. सर्वांना एकत्र घेवून काम करण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या विचारातून एक स्त्री असून ही मला अमेरिकेत मला मोठे यश मिळाले आहे.


तर संजय आवटे म्हणाले की, विविध राजे रजवाडे यांच्या प्रातांमध्ये विभागलेल्या रायांना महात्मा गांधींनी एकत्र केले. राष्ट्रीय एकात्मता ही अस्मिता ठेवून लोकशाही जपण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे.  प्रत्येक देशाने आपापल्या ताकतीवर प्रगती साधली आहे मात्र या प्रगतीमध्ये वाढलेला वर्चस्ववाद हा काहीसा धोकादायक ठरू शकतो मात्र संपूर्ण जगाला शांततेचा आणि एकात्मता मंत्र देणारे महात्मा गांधी हे खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय पुरुष होते त्यांच्या विचारांची गरज यापुढेही संपूर्ण जगाला राहणार असल्याचे ते म्हणाले
या चर्चासत्रामध्ये रायाचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात,अमेरिकेतील अर्थत-ा डॉ.विजय जोशी, अमेरिकेतील गांधीयन सोसायटीचे राजेंद्र डिचपल्ले,दिल्ली विद्यापीठाचे प्रा.सौरभ बाजपेयी, अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर अजिंक्य इंगळे,भारत अमेरिका आर्थिक धोरण संस्थेचे अबुसालेह शरीफ, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा,डॉ.सुनिल देशमुख,डॉ.विरल देसाई यांनी एकविसाव्या शतकात गांधीजींच्या विचारांचे महत्त्व या विषयावर आपले मत व्यक्त केले.

COMMENTS