ड्रोनद्वारे औषधे घरपोच होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रोनद्वारे औषधे घरपोच होणार

येत्या काही दिवसांत आपल्याला औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता उरणार नाही. कारण देशातील पहिला व्हिज्युअल लाईनच्या पलीकडे ड्रोनच्या मदतीने औषधांची डिलीव्हरी करण्याच्या प्रयोगाची पहिली ट्रायल ही बंगळूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये सुरू होणार आहे.

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24

बंगळूरः येत्या काही दिवसांत आपल्याला औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता उरणार नाही. कारण देशातील पहिला व्हिज्युअल लाईनच्या पलीकडे ड्रोनच्या मदतीने औषधांची डिलीव्हरी करण्याच्या प्रयोगाची पहिली ट्रायल ही बंगळूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये सुरू होणार आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास आपल्याला थेट ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार आहेत. 

बंगळूर येथील ’थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स’ या कंपनीला मार्च 2020 मध्ये नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून वस्तू ड्रोनच्या सहाय्याने डिलीव्हर करण्यासंबंधीची परवानगी देण्यात आली होती; मात्र कोरोना महामारीमुळे इतर काही परवानग्या न मिळाल्याने हा प्रयोग रखडला होता. आता या संस्थेला आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर 18 जूनपासून 30-45 दिवसांमध्ये चाचण्यांचा पहिला सेट पार पाडणार आहे. प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी या चाचण्यांना पाठिंबा दर्शविला असून नारायण हेल्थ हे टीएएसबरोबर भागीदारी करणार आहेत. या चाचण्या दरम्यान वाहतुकीसाठी वापरले जाणारी औषधे त्यांच्याकडून पुरवली जाणार आहेत. टीएएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेन्द्रन कंदासामी यांनी सांगितले, की इतर दोन कॉन्सोर्सियांनादेखील या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे; पण आमचा प्रयोग हा पहिला अधिकृत/कायदेशीर प्रयोग असेल. यात 2016 पासून आम्ही बरीच प्रगती केली असून बर्‍याच प्रतीक्षेनंतर आम्हाला इतङजड बीव्हीएलओएस प्रयोग मॉनिटरींग कमिटीकडून या प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे आणि भारतात लवकरच व्यावसायिक ड्रोन डिलीव्हरीचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत. या प्रयोगांदरम्यान कन्सोर्टियम त्यांच्या ड्रोनचे दोन व्हेरियंट वापरेल. मेडकोप्टर आणि टीएएस ऑन डिमांड सॉफ्टवेअर रेनडिंट हे या प्रयोगादरम्यान वापरले जाईल. यापैकी लहान व्हेरियंट असलेले मेडकोप्टर हा ड्रोन 1 किलो वजन 15 किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर दुसरा व्हेरियंट हा 2 किलो वजन 12 किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन जातो. 30-45 दिवसांपर्यंत या ड्रोनच्या रेंज आणि सेफ्टीबद्दल चाचणी करीत आहोत. त्यादरम्यान डीजीसीएनुसार आम्हाला किमान 100 तास उड्डाण करावे लागेल. सुमारे 125 तास उड्डाण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ट्रायलच्या शेवटी नोंदी पुनरावलोकन अधिकार्‍यांना सादर केल्या जातील, असे कंदासामी म्हणाले. कंदासामी यांनी स्पष्ट केले, की नारायण हेल्थची भागीदारी ही ड्रोनच्या सहाय्याने कोणत्या प्रकारच्या औषधांची वाहतूक केली जाऊ शकते. कोणती आव्हाने असू शकतात आणि भविष्यातही याचा नियमित वापर केला जाऊ शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी असेल. आमच्या सॉफ्टवेअरला नारायण हेल्थकडून करण्यात आलेल्या मागणीचा प्राप्तकर्ता कोण आहे हे कोणालाही माहिती होणार नाही; परंतु डिलीव्हरी ही आधी लोड केलेल्या पत्त्यावर केले जाईल असे कंदासामी या वेळी स्पष्ट केले.

COMMENTS