डोळे हलताना दिसले…पाणी पाजले आणि तो उठून बसला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोळे हलताना दिसले…पाणी पाजले आणि तो उठून बसला…

अहमदनगर/प्रतिनिधी-दोन दिवसांपासून तो झाडाखाली निपचित पडला होता...बहुदा त्याने इहलोकीचा निरोप घेतला असावा, अशा विचारांतून पाहणारांनी पोलिसांना बोलावले.

अमृतवाहिनी कॉलेजचा बारावीचा 99.39 टक्के निकाल
युवकांनी ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून कार्य करावे – डॉ. आर. जे. बार्नबस
शिवसेनेचे पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात सायकल रॅली

अहमदनगर/प्रतिनिधी-दोन दिवसांपासून तो झाडाखाली निपचित पडला होता…बहुदा त्याने इहलोकीचा निरोप घेतला असावा, अशा विचारांतून पाहणारांनी पोलिसांना बोलावले. त्याची पाहणी करता करता त्याचे डोळे हलताना दिसले. मग त्याच्या तोंडावर पाणी मारले व थोडे त्याला पाजलेही…त्यामुळे शरीरात तरतरी आली व तो उठून बसला. राहाता तालुक्यातील केलवडच्या एका कथित मृतदेहाच्या चर्चेची ही सांगता. 

 याबाबतची माहिती अशी की, राहाता तालुक्यातील केलवड गावाजवळ काही अंतरावर शिर्डी बायपास आहे. येथील एका चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दोन दिवसांपासून निपचित पडून असल्याचे व त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे काही गावकर्‍यांनी पाहिले. त्यांना ती व्यक्ती मरण पावली असावी, असा संशय आल्याने त्यांनी ही माहिती आधी गावचे पोलिस पाटील सुरेश गमे यांना दिली. त्यांनीही खात्री करून घेऊन ही माहिती राहाता पोलिसांनी कळविली. केलवड गावात बेवारस मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक सुभाष भोये सहकार्‍यांसह तेथे दाखल झाले व त्यांनी त्या कथित मृतदेहाची पाहणी सुरू केली. अंगात पँट-शर्ट घातलेली ही व्यक्ती अंदाजे 55 वर्षांची होती, दाढी वाढलेली होती. पोलिस नाईक पंकज व्यवहारे, चंद्रकांत भोंगळे आणि इफ्तिकार सय्यद यांनी त्याच्याजवळ जाऊन पाहणी केल्यावर व्यवहारे यांना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाल्याचे जाणवले. त्यामुळे तो मृतदेह नसून ती जिवंत व्यक्ती असल्याचे जाणवले. लगेच तातडीने हालचाली सुरू होऊन त्याच्या तोंडावर पाणी मारण्यात आले व त्याला थोडे पाणीही पाजण्यात आले. ओआरएस पेयही आणून पाजण्यात आले. त्यामुळे अंगात त्राण आल्याने ती व्यक्ती उठून बसली. सभोवती जमलेली गर्दी व पोलिस पाहून अवघडून गेली. त्यानंतर थोडी शुद्ध येताच ती व्यक्ती उठून उभी राहिली. ग्रामस्थ त्याला मृतदेह समजले असले तरी अखेर ग्रामस्थांसह पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने तातडीने हालचाल केल्याने भूकबळी होता होता वाचला.

त्यांना काहीही आठवत नाही

पाणी सेवनाने अंगात त्राण आलेल्या त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर तो चिंचेच्या झाडाखाली कसा आला, हे त्याला आठवत नसल्याचे स्पष्ट झाले. त्या व्यक्तीने त्याचे नाव पंकज सोनवणे (वय 55, रा. अंमळनेर, जि. जळगाव) व रेल्वेत लेखा विभागात नोकरीला असल्याचे सांगितले. त्याच्या खिशात मोबाईल, नाव-पत्ता सापडला. मात्र, ते येथे कसे आले, याबद्दल त्यांना काही सांगता आले नाही. त्यानंतर त्यांना चहा-बिस्कीटे देण्यात आली. अंघोळ घालण्यात आली. त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याने ते निपचित पडले होते. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात नेऊन त्यांना जेवणही दिले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बरेच दिवस उपाशी असल्याने त्यांना थकवा आला आहे.त्यां ंच्या अंगावरील कपडे खराब झाल्याने पोलिस पाटील गमे यांनी त्यांना दुसरे कपडे दिले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून, ते आल्यावर त्यांच्या ताब्यात सोनवणे यांना दिले जाणार आहे.

COMMENTS