नगरला होणारे अंत्यविधी स्थानिक स्तरावर करा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

नगरला होणारे अंत्यविधी स्थानिक स्तरावर करा

आ. जगतापांची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे मागणी

नेव्ही भरती नियुक्तीचे पत्र निघाले बनावट…एकास अटक
डीजेप्रकरणी 14 मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे
पगारवाढीसाठी अवतार मेहेरबाबा कामगारांची निदर्शने

आ. जगतापांची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा अंत्यविधी नगरच्या अमरधाममध्ये करण्याऐवजी त्यांच्या स्थानिक स्तरावर करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्याची मागणी शहराचे आ. संग्राम जगताप यांनी केली आहे. यामुळे अहमदनगर शहरातील स्मशानभूमीतील वर्दळ कमी होईल आणि अहमदनगर शहरातील या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे अंत्यविधी लवकरात लवकर करता येतील, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

आ. जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आयुक्त शंकर गोरे यांना शनिवारी यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहरात कोविड 19 च्या प्रार्दुभावामुळे मृत्युझालेल्या बाहेरील रुग्णांचा अंत्यविधी शहराबाहेर करण्याची गरज आहे. अहमदनगर शहरात व तालुका स्तरावर कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बाधीत रुग्णांचे मृत्युचे प्रमाण सद्यस्थितीत वाढलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही रुग्णाचा मृत्यु झाला की त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नगर शहरातील स्मशानभूमीत मृतदेह आणला जातो व त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी प्रचंड गर्दी असते. त्यामुळेही कोविड 19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तसेच नगरच्या अमरधाम स्मशानभूमीलगतचा परिसर हा शहरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण आहे. तसेच या ठिकाणी अंत्यविधी केल्याने मोठ्याप्रमाणात धुराचे साम्राज्य या परिसरात पसरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नुकतेच हवेतूनही कोविड 19 चा प्रार्दुभाव होत असल्याचे संशोधन समोर आले आहे. त्यामुळे या भागातील अनेक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था यांनी कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी त्यांच्या स्थानिक स्तरावर करण्याबाबत मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही आ. जगताप यांनी केली आहे.

COMMENTS