डॉ. शेळके आत्महत्येचा तपास पोलिस करणार

Homeमहाराष्ट्र

डॉ. शेळके आत्महत्येचा तपास पोलिस करणार

अहमदनगर/प्रतिनिधी- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातला तपास पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती जिल्हा

झोपलेल्या चालकाला मारहाण करून गाडी व पैसे पळवले
गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी– पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातला तपास पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
डॉ. शेळके यांनी दोन दिवसांपूर्वी कामावर असताना वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद आता जिल्ह्यामध्ये उमटू लागले आहे. बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणामध्ये संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या नावाचा उल्लेख शेळके यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आल्यामुळे अनेक शंका उपस्थित झालेल्या आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाशी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. डॉ. शेळके यांच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली होती. एका शिष्टमंडळाने पालकमंत्री यांना भेटून त्यांना निवेदन दिले होते. पण शिष्टमंडळातील अन्य डॉक्टरांना पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले नसल्याने डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर बोलताना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणासंदर्भात आम्ही सध्या आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहे तसेच ज्यांना यासंदर्भात काही निवेदन अथवा काही विशेष माहिती सांगायची असेल तर त्यांनी ती जरुर आम्हाला सांगावी, आम्ही या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

COMMENTS