Homeताज्या बातम्याअहमदनगर

डॉ. तनपुरे कारखाना उस गाळप हंगामासाठी सज्ज

डॉ. तनपुरे कारखान्याला शासनाकडून मुदतवाढ मिळण्यास हिरवा कंदिल मिळाल्याने कारखाना सुरू होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. संचालक मंडळाने आगामी काळात 7

खा. विखेंनी ‘अर्बन’ ची निवडणुक टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी- सुधीर मेहता
जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न


डॉ. तनपुरे कारखान्याला शासनाकडून मुदतवाढ मिळण्यास हिरवा कंदिल मिळाल्याने कारखाना सुरू होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. संचालक मंडळाने आगामी काळात 7 लाख मे. टन ऊस गाळपाच्या दृष्टीने यंत्रणा हाती घेतली आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या पत्रामध्ये तनपुरे कारखान्याचे नाव नसल्याने मुदतवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्याचे दिसत आहे.
जून 2021 मध्येच कारखाना संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कारखान्यावर आर्थिक अरिष्ट असल्याने सत्ताधारी गटाकडून मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात होती. खासदार डॉ. सुजय विखे यांनी तनपुरे कारखान्याला मुदतवाढ मिळावी म्हणून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. अखेर विखे यंत्रणेला यश मिळाले आहे. तनपुरे कारखान्याच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न करीत असतानाच नुकतेच नगर जिल्ह्यातील कारखान्याच्या निवडणुकांचे पत्र सहकार खात्याला मिळाले. यामध्ये डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीबाबत उल्लेख नसल्याचे पाहून मुदतवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयाचा संचालक मंडळाला मोठी ताकद मिळाली आहे. परिवर्तन मंडळाला आपल्या कार्यकाळातील शेवटचा गाळप हंगाम पूर्ण करण्यासाठी शासनानकडून हिरवा कंदिल मिळाला असून त्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. कामगारांनी केेलेल्या आंदोलनानंतर खासदार डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समन्वयातून कामगारांची देणी मिळू लागली आहे. कामगारांच्या खात्यामध्ये वेतन जमा झाल्याने कामगारही संचालक मंडळाच्या हाकेला प्रतिसाद देऊन कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी तत्पर झालेले आहे.
दरम्यान, राहुरी परिसरात निसर्गाच्या कृपेमुळे ऊस क्षेत्रातही मोठी वाढ झालेली आहे. तब्बल 16 हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा गाळपासाठी ऊस उभा आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्यासाठी अच्छे दिनाचे संकेत ठरणार आहे. खासदार विखे व संचालक मंडळाने कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वस्वी प्रयतन सुरू केलेले आहे. मागिल काळातील थकीत देणी अदा करणे, कामगारांना देणी देण्याबाबत संचालक मंडळाने अनेक प्रयत्न केले आहे. त्यास यश लाभले असून नुकतेच कामगारांच्या बँक खात्यामध्यये कारखान्याकडून वेतन जमा झाल्याने कामगारांमध्ये समधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरी परिसरात 16 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपासाठी सज्ज असणार आहे. राहुरी तालुक्यातूनच 13 लाख मे.टन ऊस गाळप होणार असल्याने डॉ. तनपुरे कारखान्याला अधिक प्रमाणात गाळप करून कारखान्याला आर्थिक परिस्थिती बळकट करण्याची नामी संधी असणार आहे. एकीकडे निसर्गाची कृपा असताना दुसरीकडे शासनाकडून संचालक मंडळाची मुदतवाढीची मागणी मान्य झाल्याने तनपुरे कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने दुग्धशर्करा योग आला आहे.

COMMENTS