प्रतिनिधी : मुंबई“ठाकरे सरकारने कोरोना काळात महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची फसवणूक केली. ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यांना ठिकाणावर आण
प्रतिनिधी : मुंबई
“ठाकरे सरकारने कोरोना काळात महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची फसवणूक केली. ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यांना ठिकाणावर आणण्याची शक्ती मला दे,
अशी प्रार्थना गणराया चरणी केली आहे. हे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर आहे. मी आतापर्यंत २१ मंत्री व नेत्याचे घोटाळे उघडे पाडले आहेत. यापुढेही अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे.” असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
भिवंडी शहरातील आरोग्य उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध मान्यवर, समाजसेवक, शालेय विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार असल्याचे सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी सोमय्या यांना नोटीस देण्याची भाषा केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “मला काहीजण नोटीस देण्याची भाषा करतात. या नोटिसाला मी घाबरत नाही.
उद्धव ठाकरे यांनी माझ्या पत्नी व मुलालाही नोटीस दिली होती. अशा फडतूस नोटिसींना मी भीक घालत नाही. अनिल परब यांचे रिसॉर्ट, कार्यालय तर तोडून दाखवणार व घोटाळेबाज ठाकरे सरकारचा कारभार उघड करणार आहे.”
COMMENTS