ट्रक चालकाने केली टीव्हीची परस्पर विक्री

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

ट्रक चालकाने केली टीव्हीची परस्पर विक्री

अहमदनगर/प्रतिनिधी : पुण्यातील वाघोली येथून नगरकडे पाठवलेल्या एलईडी टीव्ही व रेफ्रिजरेटर मालामधील 41 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही ट्रक चालकाने दारू

त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा
कोपरगावमध्ये तब्बल 16 लाखांचा गुटखा जप्त
आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय

अहमदनगर/प्रतिनिधी : पुण्यातील वाघोली येथून नगरकडे पाठवलेल्या एलईडी टीव्ही व रेफ्रिजरेटर मालामधील 41 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही ट्रक चालकाने दारूच्या नशेत परस्पर विकून फसविण्याचा गुन्हा केल्याची नोंद कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की पुणे वाघोली येथील शुभांगी ट्रान्सपोर्टला कंपनी मार्फत मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे पुणेहून नगर येथे रेफ्रिजरेटर व एलईडी टीव्ही असा मालट्रकमध्ये (क्रमांक एमएच बारा एफझेड 4730) भरुन नगरकडे येत असताना ट्रकचालक रोहिदास महादेव सानप (राहणार खांदवे नगर, तालुका हवेली, पुणे) याने दारुच्या नशेत गाडीतील 41 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही परस्पर विकला. त्यानंतर राहिलेला माल त्याने राम एजन्सी येथे पोहच केला.
त्यानंतर सायंकाळी राम एजन्सीचे मालक परमानंद मेंघाणी यांनी शुभांगी ट्रान्सपोर्टला फोन करून टीव्हीचा एक नग कमी असल्याचे सांगितले. त्यावर शुभांगी ट्रान्सपोर्टचे मालक सतीश ज्ञानदेव मोरे (राहणार एअरटेल टॉवर शेजारी, मांजरी खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे) यांनी ट्रकचालकास एक टीव्ही कमी असल्याबाबत विचारणा केली. त्यावर ट्रक चालकाने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यास अधिक विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने एक एलईडी टीव्ही दारूच्या नशेत विकला असल्याचे सांगितले. यावर रोहिदास याचा भाऊ अंबादास यास याबाबत मोरे यांनी सांगितले. त्यावर, अंबादास याने तुम्ही पोलिस कंप्लेंट करु नका, पंधरा दिवसात भरपाई करून देतो, अशी विनंती केली. त्यावर मोरे यांनी पोलिसात कंप्लेंट दिली नाही. परंतु वेळोवेळी विनंती करूनही रोहिदास व अंबादास यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली व मोरे यांना पैसे दिले नाहीत, यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सतीश मोरे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक टकले करीत आहे.

COMMENTS