जैन मुनींची मंदिरात आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैन मुनींची मंदिरात आत्महत्या

घाटकोपर येथे एका जैन मुनींनी मंदिर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.

मराठा आरक्षणासाठी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार : संभाजीराजेंची घोषणा (Video)
डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी

मुंबई / प्रतिनिधीःघाटकोपर येथे एका जैन मुनींनी मंदिर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे. मनोहर लाल मुनी महाराज असे आत्महत्या करणार्‍यांचे नाव आहे. ते 71 वर्षाचे होते. बुधवारी रात्री मनोहर लाल मुनी महाराज यांनी मंदिरात गळफास घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहचले. 

सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. मनोहर लाल मुनी महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात मुनी यांनी म्हटले, की माझ्या स्वप्नात माझे गुरू आले. त्यांनी मला सांगितले, की या पृथ्वीवरचे तुझे काम संपले. तू आता परत ये असे सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. या घटनेत अद्याप काही संशयास्पद दिसत नाही. आम्ही सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी मनोहर लाल मुनी महाराजांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पंतनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS