जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते पत्रकारांना स्वलिखीत पुस्तके व छत्रीचे वाटप..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते पत्रकारांना स्वलिखीत पुस्तके व छत्रीचे वाटप..

निघोज प्रतिनिधी संदिप गाडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर  तालुक्यातील पत्रकारांनी रविवार दि.२४ आॅक्टोबर रोजी सकाळी राळेगणसिध

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा ; महावितरणचे आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांची नियुक्ती 
भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा

निघोज प्रतिनिधी संदिप गाडे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर  तालुक्यातील पत्रकारांनी रविवार दि.२४ आॅक्टोबर रोजी सकाळी राळेगणसिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पारनेर तालुक्यात महीलांवरील वाढते अत्याचार,वाढती गुन्हेगारी,अवैध धंदे आदी विषयांवर अण्णांशी सखोल चर्चा केली.अण्णा आपण समाजाला व प्रशासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे.

वेळ पडल्यास याविरुध्द मोठी चळवळ उभी करुन तिचे नेतृत्व अण्णांनी करावं अशी मागणीही राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातुन करण्यात आली.त्याला अण्णांनी दुजोरा देत त्यासाठी गावोगावी पक्षविरहीत मोठी जनशक्ती उभी राहण्याची गरज असल्याचे सांगीतले.या सर्व विषयांवर बोलताना अण्णांनी सविस्तर मार्गदर्शन केले.हे सर्व थांबवायचे असेल तर फक्त पत्रकारांच्या लेखनीने हा प्रश्न सुटणार नाही. भ्रष्टाचार कुठे थांबलाय.त्यासाठी गावोगावी जनजागृती व्हाॅयला हवी.प्रशासनाने तत्पर असायला हवे.आणि यातुन एक मोठी चळवळ आपण सर्वांना सोबत घेवुन उभी करुयात तरच हे शक्य होईल असे अण्णा म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जिल्हासचिव तथा पारनेरचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अण्णांचा शाल,श्रीफळ देवुन सत्कार केला. तसेच अण्णांच्या हस्ते पत्रकारांना,अण्णांची स्वलिखीत अनुभवाचे बोल, राळेगणसिध्दी एक अल्पपरीचय, हि दोन पुस्तके व छत्रीचे वाटप करण्यात आले.दरवर्षी पत्रकार संघाचे माध्यमातुन पत्रकारांना काहीतरी भेट दिली जाते. संघटनेच्या माध्यमातुन दर महीन्याला काहीतरी कार्यक्रम घेतला जात असतो.

मग त्यामधे कोरोना काळामधे संघटनेने मास्क,सॅनिटायझरचे वाटप,समाजातील कोरोना काळामधे चांगले काम करणार्‍या व्यक्तींना ” कोरोना योध्दा ” पुरस्कार देणे,वृक्षारोपण करणे,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आदी कार्यक्रम राबविले जातात.त्याबद्दल अण्णांनी संघटनेच्या सामाजिक सेवचे तोंडभरुन कौतुक केलेत्यानंतर पत्रकारांनी मिडीया सेंटरला भेट देत अण्णांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हासचिव तथा पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर, उपाध्यक्ष शिरीष शेलार,राम तांबे, एकनाथ भालेकर,विनोद गायकवाड,सचिव बाबाजी वागमारे,पारनेर शहर प्रमुख सतोष सोबले,संपर्कप्रमुख संजय मोरे,खजिनदार संदिप गाडे,जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शक रामदास नरड,अविनाश भामरे पत्रकार गंगाधर धावडे,आनंदा भूकन, संपत वैरागर आदी पत्रकार उपस्थित होते.प्रास्ताविक संजय मोरे यांनी केले.सुत्रसंचालन बाबाजी वाघमारे यांनी तर,आभार एकनाथ भालेकर यांनी मानले.

COMMENTS