जम्मू-काश्मीरमध्ये 7 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरू

Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये 7 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगर : गेल्या 10-12 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरूच होती. ज

शोषणमुक्त विवाह
आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका
ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव

श्रीनगर : गेल्या 10-12 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरूच होती. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. या दरम्यान, कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन सैनिक शहीद झाले. दोन जवानांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. पुढे ही शोधमोहीम पुंछमधील मेंढर आणि राजौरीतील थानामंडीपर्यंत सुरु आहे. गुरुवारी दहशतवाद्यांशी चकमक झाली होती त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नार खास जंगल परिसरात एक जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले. या दरम्यान, जीव गमावलेल्या सैनिकांची संख्या आता चार झाली आहे. याआधी, नार खास जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमन विक्रम सिंह नेगी आणि योगम्बर सिंह शहीद झाल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यात आली आहे.
नेगी आणि सिंह दोघेही उत्तराखंडचे होते. सैन्य दलाचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी ‘दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कार्यरत आहोत. सुभेदार अजय सिंह आणि नाईक हरेंद्र सिंह या दरम्यान शहीद झाले आणि त्यांचे पार्थिव सापडले आहेत. शहीद झालेले जवान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेचा भाग होते. 11 ऑक्टोबर रोजी पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एका कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी शहीद झाला होता. दहशतवादी पुंछच्या सुरणकोटे जंगलात सैन्य गस्त घालत होते. दहशतवादी अधिकारी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणांकडे स्थलांतरित होत आहेत. राजौरीच्या थानामंडी जंगलात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. मेंढर ते थानामंडीपर्यंतचा संपूर्ण जंगल परिसर सैन्य दलानं सर्च ऑपरेशन सुरु केलंय. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दहशतवादी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राजौरी-पुंछ रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक विवेक गुप्ता यांनी मंगळवारी पूंछमधील सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात लपून बसल्याची माहिती दिली. जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ भागात यावर्षी जूनपासून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. वेगवेगळ्या चकमकींमध्ये आतापर्यंत नऊ दहशतवादी मारले गेले आहेत.

लष्कर ए तोएबाचा कमांडरचा केला खात्मा
जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सैनिकांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेला याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. घाटीमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे.

COMMENTS