कर्जत प्रतिनिधी व्याजापोटी एका शेतकऱ्याची विहीर स्वतःच्या नावावर करून तिची परस्पर विक्री करणाऱ्या व फिर्यादीला व्याजाच्या पैशांसाठी शिवीगाळ व
कर्जत प्रतिनिधी
व्याजापोटी एका शेतकऱ्याची विहीर स्वतःच्या नावावर करून तिची परस्पर विक्री करणाऱ्या व फिर्यादीला व्याजाच्या पैशांसाठी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या तालुक्यातील तीन सावकारांविरोधात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आता सामान्य नागरिकांना सावकारकीचे फास सैल होऊ लागले आहेत. अशोक रामदास शिंदे,राजेंद्र महादेव कापरे (दोघेही रा.कापरेवाडी ता.कर्जत),विशाल उर्फ भाऊ जगताप (रा.सुपे ता.कर्जत) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी नाना किसन धनवडे (रा.कापरेवाडी सध्या धायरी फाटा,पुणे) यांनी सन २०१७ साली आपल्या कापरेवाडी गावाच्या शिवारातील शेततळ्यात प्लास्टिकचा कागद टाकण्यासाठी पैसे नसल्याने त्यांचा मित्र नामे राजेंद्र कापरे यास कुठूनतरी पैसे पाहण्यास सांगितले असता कापरे याने अशोक शिंदे व विशाल उर्फ भाऊ जगताप यांच्याकडे नेले.त्यावेळी १० रुपये टक्के व्याजदराने पैसे मिळतील असे फिर्यादीला सांगितले.त्यावेळी अशोक शिंदे याच्याकडून ४५ हजार व विशाल उर्फ भाऊ जगताप याच्याकडून ५० हजार व्याजाने घेतले.शेतातील उत्पन्न न निघाल्याने फिर्यादीला व्याज देता आले नाही तेंव्हा तिघेही फिर्यादिस धमकावू लागले.त्यामुळे सन २०१८ साली फिर्यादीने कर्जत पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता.मात्र यापुढे कसलाच त्रास देणार नाही व व्याजही घेणार नाही म्हणत समझोता करून हा अर्ज मागे घेण्यात आला.त्यानंतर त्यांनी मध्यस्ती असलेल्या कापरेमार्फत पैशाची मागणी सुरू केली.पोलीस ठाण्यात तक्रार करू नये म्हणून अतिशय अश्लील शिवीगाळ व दमदाटी करू लागले.त्यानंतर तिघांनीही फिर्यादीच्या घरी येऊन ‘अशोक शिंदे यांच्याकडून ३ लाख घेतले असल्याची नोटरी करून दे आणि तू जर ऐकले नाही तर तुला बघून घेतो’ असे म्हणत दबाब टाकत मारहाण केली व अशोक शिंदे याच्याकडून ३ लाख उसने घेतल्याची नोटरी दि.४ जाने.२०१८ रोजी करून घेतली. त्याबदल्यात त्यांनी फिर्यादीची विहीर लिहून घेतली.पैसे परत केल्यावर विहीर पुन्हा नावावर करून देण्याचे ठरले होते.तेव्हाही तहसील कार्यालयासमोर अशोक शिंदे याने ‘तुझा पाय काढीन, तुला गावात राहू देणार नाही’ असे धमकावत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.त्यानंतर हे सत्र असेच सुरू असताना ‘तुझा खुन करीन,व्याजाचे पैसे टाक’ म्हणत (दि.३ एप्रिल २०१८) रोजी बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी (एम एच१२ डी.एन.८२६२) व ओप्पो कंपनीचा मोबाईल व्याज देत नाही म्हणुन फिर्यादीकडून नेला होता मात्र पैसे देतो असे म्हणून थोडे पैसे दिल्यावर परत दिला. (दि.४ जाने.२०१८) रोजी तीनही आरोपी फिर्यादीच्या घरी येऊन ‘तुझी विहीर राजेंद्र कापरेच्या नावे करून दे’ अशी दमदाटीने मागणी केली व कर्जत शिवारातील गट नं.१७५ मधील विहीर बळजबरीने नावे करून घेतली.राजेंद्र कापरे याने ती विहीर स्वतःच्या मालकीची आहे असे सांगून मधुकर रवींद्र कापरे (रा. कापरेवाडी) यास ३ लाखाला विकली व विक्री करून आलेली रक्कम तिघा आरोपींनी वाटून घेतली.आता कर्जत पोलिसांनी तिघांवर कलम ४५२,२९४,३२३,५०४,५०६,३४ तसेच महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ चे कलम ३९ प्रमाणे दि.३ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार सलीम शेख, अमित बर्डे, ईश्वर माने, शाहूराज टिकटे, प्रवीण अंधारे यांनी केली आहे.
COMMENTS