जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले

जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास नगरसह जिल्हावासियांनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जमिनीच्या वादातून एकाला मारहाण
यवत येथील कांचन व्हेज हाँटेला भिषण आग l पहा LokNews24
घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन

अहमदनगर/प्रतिनिधी- जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास नगरसह जिल्हावासियांनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी घराबाहेर पड़ण्याचे टाळले तसेच लॉकडाऊनच्या नव्या नियमांचेही पालन कसोशीने केले. 

नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकलची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नगर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू 14 दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचा पहिला दिवस रविवारी होता. रविवारच्या सुट्टीमुळे तसेही कोणी बाहेर पडत नसते. पण आजच्या रविवारी जनता कर्फ्यू व लॉकडाऊन निर्बंधही असल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले.

तुरळक वाहतूक-शहर सुनसान

नगर शहरातून जाणार्‍या पुणे, मनमाड, औरंगाबाद, जामखेड, पाथर्डी, कल्याण, दौंड या महामार्गांवर रविवारी तुरळक वाहतूक होती. मालवाहतुकीची वाहनेच या रस्त्यांवर दिसत होती. शहर हद्दीतून जाणार्‍या महामार्गावर स्थानिक वाहतूकही कमीच होती. एखाददुसरे वाहन वा रिक्षा फिरताना दिसत होते. तसेच शहराच्या अंतर्गत भागातील चितळे रस्ता, नवीपेठ, कापड बाजार, माळीवाडा, पारशा खुंट, जुना बाजार तसेच उपनगरांतील सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहोर रस्ता, पाईपलाईन रस्ता, कुष्ठधाम रस्ता तसेच केडगाव, सारसनगर, बालिकाश्रम रस्ता परिसरातील रस्तेही सुनसान होते. काही ठिकाणी युवक बंद दुकानांच्या पायर्‍यांवर गप्पा मारताना दिसत होते.

लॉकडाऊन निर्बंध पालन

नवे लॉकड़ाऊन निर्बंध शनिवारी रात्री जिल्हा प्रशासनाने जारी केले व ते सोशल मिडियातून शहरभर व्हायरल झाले. व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकद्वारे नागरिक, दुकानदार, व्यावसायिकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचल्याने त्याचा परिणाम रविवारी सकाळी दिसला. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने वगळता अन्य किराणा, पशुखाद्य, दूध विक्री, अंडी-मटण विक्री दुकाने सकाळी 7 ते 11पर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने या वेळेतच येऊन नागरिकांनी त्यांना आवश्यक त्या साहित्याची खरेदी केली. भाजी विक्रेत्यांना एका जागी न बसता कॉलन्यांतून फिरून भाजी विक्रीची याच चार तासात मुभा दिली असल्याने त्याच वेळेत सायकल, रिक्षा, टेम्पो, हातगाडी यावर भाजी विक्री करीत फिरणारे कॉलन्यांतून दिसत होते. पेट्रोल पंपही सकाऴी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार असल्याने रविवारी सकाळी या वेळेतच वाहनांतून पेट्रोल भरण्याची लगबग काही वाहनचालकांची सुरू होती. सकाळी 11 नंतर मात्र जवळपास सर्वच रस्त्यांवर सुनसानपणा पसरला होता.

COMMENTS