Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात .

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला

 मालेगाव  शहरातील जुन्या आग्रा महामार्गावर  बस व रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक जण जखमी झाला आहे. या रस्त्यावर गेल्

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
आसाममधील गुवाहाटी मध्ये रस्ता अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू
भीषण अपघात ! 3 जण जागीच ठार

 मालेगाव  शहरातील जुन्या आग्रा महामार्गावर  बस व रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक जण जखमी झाला आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले, मात्र तेही अपूर्ण आहे . त्यामुळे सातत्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातूनच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात रिक्षा गेली. सुदैवाने ती पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अपघातानंतर जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे . दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS