गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण.

Homeताज्या बातम्यादेश

गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण.

30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल.

उत्तर प्रदेश प्रतिनिधी-   उत्तर प्रदेशमध्ये(In Uttar Pradesh) एक संतापजनक घटना घडली आहे. एका सरकारी शाळेत 5 वर्षांच्या चिमुकलीला शिक्षिकेने बेदम मारह

अपहरण केलेल्या महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार
विदेशी घड्याळ अपहाराप्रकरणी आरोपीला अटक
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची निवड

उत्तर प्रदेश प्रतिनिधी-   उत्तर प्रदेशमध्ये(In Uttar Pradesh) एक संतापजनक घटना घडली आहे. एका सरकारी शाळेत 5 वर्षांच्या चिमुकलीला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीने गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने मुलीला अक्षरश: बेदम मारले. 30 सेकंदात तिला 10 वेळा थोबाडीत मारले. मार खाल्ल्यामुळे मुलीचा चेहरा सुजला होता. मुलगी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिचा चेहरा पाहून पालकांना मोठा धक्का बसला. पालकांनी या प्रकरणी शाळेत जाऊन तक्रार केली. त्यावेळी शिक्षिकेने पालकांची माफी मागून पोलीस तक्रार न करण्याची विनंती केली. शिक्षिका मुलीला मारत असताना कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

COMMENTS