Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

त्र्यम्बकेश्वर मधून मंदिर स्वच्छता मोहिमेची सुरुवात

नाशिक प्रतिनिधी - २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पडणार असून हिंदू संस्कृती प्रमाणे देशातील सर्व मंदिरे स्व

भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक.
थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
पाकिट चोरल्याच्या संशयातून भर रस्त्यात जमावाकडून महिलेला मारहाण

नाशिक प्रतिनिधी – २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पडणार असून हिंदू संस्कृती प्रमाणे देशातील सर्व मंदिरे स्वच्छ करून २२ जानेवारी रोजी प्रत्येक मंदिरात दिवा लावून दिवाळी साजरी करावी असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केल्यानंतर त्यांनी नाशिक दौरा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला. देशातून ८ ते दहा हजार नवयुवक यांनी नाशिक मधील युस्थ फेस्टिवल मध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. अशा चैतन्यमय वातावरण बघून महायुतीचे कार्यकर्त्यांनी मनावर घेत अखंड भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्री राम चंद्र यांचे नाशिक नगरीतून महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसते आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यम्बकराज येथील मंदीराची स्वच्छता मोहीम खासदार हेमंत गोडसे यांचे नेतृत्वाखाली पार पडली.

यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. 

दरम्यान त्रंबकेश्वर नगरपालिका , त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी ही स्वच्छता मोहीम आयोजित केलेली होती त्यामुळे त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्ट विश्वस्तांसह इतर पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

COMMENTS