गाळप हंगामात ऊस वाहतूकदार संपावर जाण्याच्या तयारीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाळप हंगामात ऊस वाहतूकदार संपावर जाण्याच्या तयारीत

अहमदनगर/प्रतिनिधी : एकीकडे उसाच्या एफआरपी व दराबाबत आंदोलन सुरू असतानाच आता ऊस वाहतूक करणारे चालक व मालकांनीही वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी केली आह

लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात
आमदार आशुतोष काळेंनी केलेल्या नियोजनातून रुग्णसंख्या नियंत्रणात येईल: नामदार हसन मुश्रीफ
Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी

अहमदनगर/प्रतिनिधी : एकीकडे उसाच्या एफआरपी व दराबाबत आंदोलन सुरू असतानाच आता ऊस वाहतूक करणारे चालक व मालकांनीही वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गाळप हंगामात ऊस वाहतूक बंदचाही निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही चालक-मालकांनी दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले, इंधन दरवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करण्याबरोबरच एवढी अवजड वाहने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे. इंधन दरवाढ आकाशाला जाऊन भिडली असतानाच व पेट्रोलच्याच भावात डिझेल मिळत असताना जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांना अर्ज-विनंत्या करूनही ऊस वाहतूक दरात वाढ करण्यासाठी नकारघंटा वाजविली आहे. याबाबत साखर आयुक्तांनाही मागणी करण्यात आली. मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीत नसून तो संबंधित कारखान्यांच्या अधिकारकक्षेत असल्याचे सांगून याबाबत आमच्याकडे कायदा नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे आता या प्रश्‍नावर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल वाहतूकदारांना पडला आहे.
इंधनदरवाढीबरोबरच वाहनांचे सुटे स्पेअरपार्ट, टायर व अन्य देखभाल दुरूस्तीच्या खर्चातही मोठी दरवाढ झाली आहे. चालकांचेही वेतन देणे अवघड झाले आहे. मात्र, वाहतूक दरात अद्यापही वाढ होत नाही. त्यामुळे अनेक ऊस वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यातील अनेक वाहने कर्जाऊ रकमेतून घेण्यात आली आहेत. मात्र, हा व्यवसाय करणे जिकिरीचे झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे,ही समस्या उभी राहिल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी तातडीने ऊस वाहतूकदरात वाढ करावी, अन्यथा नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशारा राहुरी तालुका ऊस वाहतूकदार संघटनेचे विष्णू मुळे, विनोद करपे, पंकज घोरपडे, अनिल कोळसे, राहुल हिरे, ज्ञानेश्‍वर करपे, बाबासाहेब चोथे, अमोल करपे, विजय मोरे, दीपक झुगे, राजू करपे, रियाज सय्यद, नाना चंद्रे, बापू गोसावी, ज्ञानेश्‍वर मोरे, शुभम माने, दत्ता काळे, भाऊसाहेब वराळे, मनोज अटक, खंडू काळे, पप्पू काळे, सागर झुगे, सचिन हारदे, हमीद सय्यद, रवी म्हसे, संदीप कटारे, योगेश गाडे आदींसह चालक-मालकांनी दिला आहे.

COMMENTS