खासदार लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग  घातक : अँड. पोळ

Homeअहमदनगर

खासदार लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग घातक : अँड. पोळ

शिर्डी मतदार संघात करोना साथीच्या उद्रेकाने नागरिक व प्रशासन हैराण झाले असताना खा सदाशिव लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग मतदार संघासाठी घातक असल्याचे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.

बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…
खैरी निमगावचा पाणीपुरवठा खंडीत
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह

कोपरगाव शहर प्रतिनिधी- शिर्डी मतदार संघात करोना साथीच्या उद्रेकाने नागरिक व प्रशासन हैराण झाले असताना खा सदाशिव लोखंडे यांचे सोशल डिस्टनसिंग मतदार संघासाठी घातक असल्याचे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ  यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील लोक सभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघाचे खासदार दाखवा व बक्षीस मिळवा अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र तरी देखील कोपरगाव तालुक्यातील जनतेने शिव सेनेचे खा सदाशिव लोखंडे यांना भरभरून मतदान करून निवडून दिले मात्र निवडून गेल्यावर पुन्हा एकदा ये रे माझ्या माघल्या…या म्हणी प्रमाणे खासदार गायब झाले खा मतदार संघात फिरकत नाही म्हणून कोणाचे काही अडले देखील नाही मात्र एक वर्षांपासून सुरू असलेल्या करोना साथीच्या आजाराने संपूर्ण तालुक्यात नागरिक हैराण झाले आहे सद्या तर साथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून कोविड सेंटर सुरू करणे व्हेंटिलेटर उपलब्ध करून  देणे आवश्यक आहे त्या साठी दिवसेंदिवस प्रशासनावर दबाव वाढत आहे मात्र शासनाने सुरक्षित अंतर ,मास्क वापरा अशा सूचना केल्या असून खासदार या सूचनांचा पुरेपूर वापर करत असून तालुक्याची परिस्थिती गंभीर असताना व राज्यात महाविकास आघाडी चे सरकार असताना शिव सेनेचे मुख्यमंत्री व खासदार असताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोपरगाव तालुक्यातील मतदारा गंभीर परिस्थितीला सामोरे जात असताना मूग गिळून बसलेले असून तालुक्यातील जनते बाबत खासदार लोखंडे यांनी पाळलेली सोशल डिस्टनसिंग घातक आहे अशीच परिस्थिती राहिली तर खासदार काय फक्त निवडून जाण्यासाठीच मतदार संघात येणार असेल तर त्यांचे तोंड कायमचे बंद केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशा इशारा देखील या पत्रकात दिला आहे

COMMENTS