कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले ! एकंदरीत सगळीच गंमत आहे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले ! एकंदरीत सगळीच गंमत आहे

प्रतिनिधी : मुंबई भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले आहे .नुकतेच राज्याचे ग्रामव

पंतप्रधान मोदी आज कारगिलला भेट देणार
नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी : मुंबई

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले आहे .नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत.

तसेच येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील (Thackeray Govt)अनेक नेत्यांचे पितळ उघड करणार असल्याचे ते म्हणाले . सध्या सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे .

शिवसेनेचे वृत्तपत्र सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. 

यावर हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकाराला दिले आहे.

सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामना वृत्तपत्रातून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा उलट सवालही सोमय्यांनी उपस्थित केला.

हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश कोल्हापूरमध्ये जाऊन करणार असल्याची घोषणा सोमय्यांनी पुन्हा केली . येत्या मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. 

मुंबई प्रभादेवी येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेतेही असतील . यात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि गोपाळ शेट्टी यांच्या नावाचा समावेश आहे

सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणं गैर आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: म्हणाले . सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती. हे चुकीचे आहे . सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळं सरकार का करतंय?असे अनेक सवाल सोमय्यांनी उपस्थित केले .

दरम्यान सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला . कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘रोखठोक’ मध्ये सोमय्यांवर टीका करत म्हणाले की , माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. 

चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला .

COMMENTS