Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा – ना.बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसें दिवस वाढणारी रुग्ण संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे.

उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा श्रीगणेश उत्सवात गौरव
बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांबे
रोटरी क्लब अकोलेकडून मदतीचा हात

संगमनेर/प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसें दिवस वाढणारी रुग्ण संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे. सध्याची दुसरी लाट ही तीव्र स्वरूपाची असून कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने शासकीय नियमांसह मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सचे पालन करत स्वयंशिस्त पाळावी. असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त करताना नामदार थोरात म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे झालेली रुग्ण वाढ ही अत्यंत चिंताजनक आहे. दिवसागणिक सुमारे पन्नास हजार लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामुळे आरोग्यसेवेवर मोठा ताण पडत आहे. कोरोना हे मानवजातीवरील मोठे संकट आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कुणीही निष्काळजीपणा करू नका. संसर्ग वाढतो आहे. शासकीय नियमांचे पालनासह मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स पाळणे. गर्दी टाळणे, घरगुती समारंभ टाळणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रूपाने शरीरात किंवा घरात प्रवेश करू शकतो. म्हणून भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. शासनाच्या वतीने कोरोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. लॉकडाऊन मुळे अनेक गोरगरिबांची हाल होतात. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून लॉकडाऊन टाळायचा असेल तर कडक निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. विशेषता शनिवारी – रविवारी लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि त्यामुळे रुग्ण वाढ होऊ शकते म्हणून दोन दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.याला नागरिकांनी सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तातडीने लसीकरण करून घ्या. लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करू नका. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गर्दी टाळा.प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे असून कोणीही निष्काळजीपणा करू नका. विनाकारण बाहेर फिरू नका. दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुले व तरुणांमध्येही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असून वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. हे सर्व टाळण्यासाठी व पुन्हा गतवैभवाचे दिवस पाहण्यासाठी सध्या स्वयंशिस्तच महत्वाची असून मनाला आवर घाला असे आवाहन करताना काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. नियमांचे पालन करा असेही नामदार थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS