कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क  ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप

कोरोना आजाराचे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलात त्यांच्यासाठी वापरलेल्या मेडिकल साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो वेस्टेज शुल्क स्वतंत्र आकारले गेले आहे.

येवला नाका भागातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण
देहरे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
श्रीगोंदा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र सुपेकर

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना आजाराचे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलात त्यांच्यासाठी वापरलेल्या मेडिकल साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो वेस्टेज शुल्क स्वतंत्र आकारले गेले आहे. या नव्या लूटमारीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यासंदर्भात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे.

कोरोना रुग्णांकडून बायोवेस्टेज वाढीव शुल्क आकारणीच्या लुटमारीला महापालिका जबाबदार असून, बायोवेस्टेजची अतिरिक्त शुल्क आकारणी ही फक्त ठेकेदाराचे घर भरण्यासाठीच असल्याचा दावा भुतारे यांनी केला आहे. त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोना महामारीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब, सर्वसामान्य माणूस उपचार घेताना रुग्णांचे नातेवाईक अव्वाच्या सव्वा बिलांमुळे आधीच त्रस्त असताना व त्यांचे कंबरडे मोडले असताना महापालिकेचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. बायोवेस्टच्या नावाखाली खासगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या बिलात प्रत्येक दिवस 1500 रुपये चार्ज आकारणी करतात. त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असून महापालिकेने कोरोना रुग्णांच्या वेस्टेज मेडिकलची शुल्क आकारणी ही अतिरिक्त व लुटणार करणारी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक हॉस्पिटलला मेडिकल वेस्टेजसाठी पर किलो 100 रुपये आकारणी असून मेडिकल वेस्टेज वाहतुकीचा खर्च हा प्रत्येक हॉस्पिटल 500 रुपयेप्रमाणे आहे. म्हणजे एका हॉस्पिटलला दर महिना 15000 रुपये प्रमाणे वाहतूक खर्च द्यावा लागतो. म्हणजे नगर शहरात जवळ्पास 100 च्या वर कोविड सेंटर असून 15 लाख रुपये वाहतुकीचा खर्च हा महापालिका व ठेकेदार गोळा करतात तसेच कोरोना रुग्णांचे मेडिकल बायोवेस्टेज प्रत्येक हॉस्पिटलमधून जवळपास हजारो रुपये दररोज महापालिका गोळा करत असून महाराष्ट्रात फक्त अहमदनगर शहरातच अशा प्रकारे खासगी हॉस्पिटलकडून बायोवेस्टेजच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारणी सुरू आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलवाले कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टच्या माध्यमातून जवळ्पास हजारो रुपयांची आकारणी करत आहेत. त्यामुळे या अतिरिक्त मेडिकल बायोवेस्टेजच्या आकरणीला महापालिका जबाबदार असून यामुळे रुग्णांच्या होत असलेल्या लुटमारीस महापालिकेचा हा निर्णय जबाबदार आहे, असा दावाही भुतारे यांनी केला आहे. घनकचरा उचलणार्‍या ठेकेदाराला मनपाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत व या ठेकेदाराचे घर भरण्याचे काम महापालिका करत असून या सर्व प्रकरणावर तातडीने कारवाई करुन कोरोना बायो वेस्टेज च्या अतिरीक्त शुल्क आकारणी रद्द करावी तसेच यापूर्वी आकारलेली रक्कम रुग्णांना त्यांच्या खात्यावर पुन्हा जमा करावी, अशी मागणी भुतारे यांनी या निवेदनात केली आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे जन आंदोलन नगर शहरात उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काही प्रश्‍न उपस्थित

भुतारे यांनी या तक्रारीत काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये इतर आजारांवरील मेडिकल वेस्टेज आकारणी व कोरोना मेडिकल वेस्टेजची अतिरिक्त शुल्क आकारणी वेगळी वेगळी का?, खासगी हॉस्पिटलमधील मेडिकल वेस्टेज गोळा करतानाच कोरोना आजारांचे मेडिकल वेस्टेज गोळा केले जाते. मग वाहतुकीचे वेगळे 500 रुपये आकारता का?, खासगी हॉस्पिटल तसेच कोवीड सेंटर दररोज जवळ्पास 100 कोवीड सेंटरचे 50 हजार रुपये कोणत्या निकषांवर घेता? कोरोना आजारांवरील रुग्णांची मेडिकल वेस्टेजची  अतिरिक्त शुल्क आकारणी शासनाच्या नियमावली नुसार आहे का? मेडिकल बायोवेस्ट नष्ट करण्यासाठी महापालिका ठेकेदाराकडून प्रकल्पाची उभारणी केलेली आहे का? नसेल तर मेडिकल वेस्टेजची अतिरिक्त शुल्क आकारणी योग्य आहे का?

COMMENTS