कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यावर डल्ला  ; कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना; सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यावर डल्ला ; कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना; सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे.

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार

पुणे/ प्रतिनिधीः कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आधीही अशीच घटना घडली होती. त्यामुळे कोविड सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल केल्यानंतर हातामधील एक लाख 35 हजार रूपये किंमतीच्या बांगड्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोशी येथील 38 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अभियंते असून ते कुटुंबासह मोशी येथे राहण्यास आहेत. त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना 24 एप्रिल रोजी देहुगाव येथील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले होते; पण त्या ठिकाणी आधुनिक सुविधा नसल्यामुळे तक्रारदारांंच्या आईला 13 मे रोजी कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले होते. त्या वेळी आयसीयूमधील नर्सने तक्रारदारांना त्यांच्या आईची दोन कर्णफुले, चार सोन्याच्या बांगड्या आणून दिल्या; पण तक्रारदारांंची आई नेहमी हातामध्ये सहा बांगड्या घालत असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी नर्स व डॉक्टरांना विचारणा केली; पण त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. तक्रारदारांंच्या आईची तब्बेत खूपच खराब होती. त्यामुळे त्यांनीदेखील याप्रकरणाकडे जास्त लक्ष दिले नाही. 22 मे रोजी तक्रारदार यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर तक्रारदारांनी घरी बांगड्या पाहिल्या. तसेच, हॉस्पिटलमध्येदेखील चौकशी केली; पण त्या सापडल्या नाहीत. त्या वेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केल्यानंतर बांगड्या चोरल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS