कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका

गेल्या महिन्यात कारखान्यांच्या उत्पादनात वाढ होण्याचे प्रमाण गेल्या सात महिन्यांत नीचांकी राहिले आहे.

81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ
रेणुका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान – आ. संग्राम जगताप
दहावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळणार

मुंबई/प्रतिनिधीः गेल्या महिन्यात कारखान्यांच्या उत्पादनात वाढ होण्याचे प्रमाण गेल्या सात महिन्यांत नीचांकी राहिले आहे. हे आयएचएस बाजाराच्या पीएमआय (खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) मध्ये दिसून येते. जे फेब्रुवारीमध्ये पीएमआय 57.5 टक्के होता. मार्चमध्ये तो 55.4 वर घसरला. कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेत पीएमआयमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम रोजगारावर होण्याची भीती आहे. 

देशातील टाळेबंदीमुळे उत्पादन वाढीच्या दरात घट झाली आहे. पीएमआय 50 च्या खाली जाणे हे औद्योगिक क्षेत्र अडचणीत असल्याचे समजले जाते. एप्रिलमध्ये उत्पादन क्षेत्रात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. वित्तीय वर्ष 2021 च्या शेवटच्या महिन्यात कंपन्यांना मिळालेल्या ऑर्डर आणि उत्पादनातील वाढीचा दर फेब्रुवारीपासून कमी आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणायचे ठरविले आहे. त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर होत आहे. एप्रिलमध्ये उत्पादनात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या बैठकीत राज्यांना कोरोना संक्रमणास आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला होता. 

दरम्यान, कंपन्यांच्या इनपुट आणि आउटपुट खर्चात वाढ होण्याचा वेगही मार्चमध्ये कमी होत होता. या व्यतिरिक्त, फेब्रुवारीमध्ये महागाई दर कमी झाला आणि तो रिझर्व्ह बँकेच्या दोन ते सहा टक्क्यांच्या लक्ष्यातच राहिला. कोरोना संसर्गात वाढ झाल्यामुळे मागणी कमी झाली. आयएचएस मार्केटमधील इकॉनॉमिक्सचे असोसिएट डायरेक्टर, पॉलियाना डी लीमा म्हणाले, की 2020 च्या शेवटच्या महिन्यात कारखान्यांचे उत्पादन मंदावले होते. त्यानंतर वेग वाढला; परंतु मार्चमध्ये पुन्हा मंदावला. निर्देशांकासाठी सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांनी कोरोना बाधितांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांची मागणी वाढण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. 12 ते 25 मार्च दरम्यान सुमारे 400 उत्पादक कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांकडून गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारे हा निर्देशांक तयार केला गेला आहे. त्यांच्या मते, काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ झाली होती; परंतु सर्वेक्षणानुसार आता कारखान्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा दर 7 महिन्यांत सर्वात कमी झाला असला तरी सलग आठव्या महिन्यांत त्यात वाढ झाली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून साठा वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात अधिक कच्चा माल खरेदी केला. मार्चमध्ये त्यांच्याकडून कच्च्या मालाच्या खरेदीतील वाढ ही दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त होती. फेब्रुवारीमध्ये मात्र इनपुट खरेदीची वाढ जवळपास दशकांच्या उच्च पातळीवर गेली. मार्चमध्ये सलग सातव्या महिन्यात निर्यातीसाठी ऑर्डर कंपन्यांना मिळाल्या.  रसायने, धातू, प्लास्टिक, रबर आणि कापडांच्या किंमती वाढल्या. आयएचएसच्या मते, चलनवाढीमुळे नेहमीप्रमाणे मार्चमध्ये कच्च्या मालाच्या खरेदीतील दरही कमी होता. 

तरीही भावना सकारात्मकच

गेल्या महिन्यात महागाई गेल्या तीन वर्षांत दुसर्‍यांदा उच्चांकावर पोहोचली. सर्वेक्षणात सामील झालेल्या कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांनी सांगितले, की रसायन, धातू, प्लास्टिक, रबर आणि कापडातील महागाई वाढली आहे. कोरोनामुळे आणि अनेक राज्यांच्या टाळेबंदीच्या कठोर धोरणामुळे एप्रिल हा महिना उत्पादन कंपन्यांसाठी एक आव्हान असेल. लसीकरणामुळे कोरोना  संसर्ग कमी होईल आणि येत्या काही महिन्यांत उत्पादन वाढेल. याचा अर्थ कंपन्यांची भावना सकारात्मक राहिली आहे; परंतु कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे ती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. 

COMMENTS