कोरोनाचा जास्त संसर्ग पसरविणारे विवाह जोरात ; पोलिसांच्या हातावर चिरी मिरी टेकवून ग्रामीण भागात शुभ मंगल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचा जास्त संसर्ग पसरविणारे विवाह जोरात ; पोलिसांच्या हातावर चिरी मिरी टेकवून ग्रामीण भागात शुभ मंगल

सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु आज ही ग्रामीण भागात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून करण्यात येत असलेल्या लग्नात सर्रास 300-500 वर्‍हाडी हजेरी लावत आहे.

दिव्यांग मतदारांसाठी आज विनामूल्य बस धावणार
राऊत-दानवेंच्या अडचणी वाढणार ?
भरधाव रिक्षातून दोन विद्यार्थिनींनी घेतली उडी, एकीचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु आज ही ग्रामीण भागात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून करण्यात येत असलेल्या लग्नात सर्रास 300-500 वर्‍हाडी हजेरी लावत आहे. याकडे पोलिस मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, कारवाई करण्याऐवजी केवळ चार-पाच हजार रुपयांची मांडवली करून शेकडोंच्या उपस्थितीला एक प्रकारे  संहमतीच देत आहेत. 

केंद्र व राज्यातील तज्ज्ञांनी विवाह, सभा, समारंभामुळे कोरोनाचा वेगात प्रसार होत असल्याची जाणीव वारंवार करून दिली आहे, तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. राज्यात कठोर निर्बंध लागू केले असले, तरी त्यांना दूर सारण्याचे काम लोक आणि सरकारी यंत्रणा करीत आहेत. गेल्या एक महिन्यात शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाला आहे. दोन-तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने आता तब्बल बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागात लग्न समारंभ व दशक्रिया विधीमध्ये शेकडो, हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याचे लक्षात आल्यावर यावरदेखील कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्नांसाठी  50 तर दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची अट घातली आहे. गेल्या एक वर्षांपासून ही अट लागू असली, तरी लोक काही केल्या ऐकत नाहीत. आजही ग्रामीण भागात लग्नासाठी 300-500 लोक उपस्थित राहतात. यामध्ये केवळ लग्न एखाद्या हॉलमध्ये न करता नवरा किंवा नवरीच्या घरासमोर मंडप टाकून लग्न समारंभ अत्यंत धुमधडाक्यात केले जात आहे. जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर  तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दारापुढे लग्नाचा नवीन फंडा सुरू झाला आहे; परंतु या दारापुढच्या लग्नात वर्‍हाड्यांच्या उपस्थितीकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. काही गावांत पोलिस कारवाईला जातात; पण केवळ चार-पाच हजार रुपयांची वसुली करून हजारोंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब जिल्ह्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते.

COMMENTS