कोपरगावात शिवजन्मोत्सव  उत्साहात होणार साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा

कोपरगाव शहर प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथी प्रमाणे येणारा जन्मोत्सव सोहळा यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात विधिवत पूजा करत कोपरगाव शिवसेनेच्या वतीने साजरा होणार असल्याचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सांगितले.

 धर्मग्रंथाची विटंबना करणार्‍यांना अटक करा ः मोरे
संगमनेर तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी
बायोडिझेल घोटाळा प्रकरणातील साबळे वाटेफळच्या गुन्ह्यात वर्ग

कोपरगाव  शहर प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथी प्रमाणे येणारा जन्मोत्सव सोहळा यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात विधिवत पूजा करत  कोपरगाव शिवसेनेच्या वतीने साजरा होणार असल्याचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सांगितले. 

या वेळी त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करतांना सांगितले की, यावर्षीचा शिवजन्मोत्सव २०२१ हा बुधवार दि ३१ मार्च रोजी साजरा होत असून त्या अनुषंगाने कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जेष्ठ शिवसैनिक मल्हारी देशमुख, बबन जोगदंड, पांडुरंग देवरे,सुनील देसाई, अजय सोनटक्के,दिलीप जाधव, संदीप गिरमे,मुन्ना आढाव हे शिवसैनिक आज मंगळवार दि ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता शिवनेरी गडावर शिव ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहे. तर उद्या बुधवार दि ३१ मार्च रोजी ठीक सकाळी ५ वाजता शिवरायांचा महाभिषेक होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल त्यानंतर शिवसेनेचे उत्तर जिल्हा पप्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख  कलविंदार डॅडीयाल, भरत मोरे ,अस्लम शेख यांच्या शुभ हस्ते व वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख, विक्रांत झावरे, विकास शर्मा,प्रविण देशमुख, गोरख चोपदार, निशांत झावरे,प्रफुल्ल शिंगाडे, आकाश कानडे,मयूर दळवी, किरण अडागळे, गगन हाडा, संतोष देवरे, श्रीपाद साठे, सागर सोमसे राजू पगारे, गोपाळ वैरागळ आदी शिवभक्तांच्या उपस्थित ठीक सकाळी ८ वाजता एस टी स्टॅण्ड समोर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.

  शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ यशस्वी संपन्न होण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष राहुल होन, अविनाश वाघ, कार्याध्यक्ष नितीन राऊत, खजिनदार बाळासाहेब साळुंखे, सचिव राकेश वाघ, व शिवज्योत प्रमुख अविनाश लोणारी आदी समिती सदस्य अथक परिश्रम घेणार असल्याचे समिती अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS