कोपरगांव मुर्शतपुर शिवारात प्रथमच नागवेली पान लागवडीचा प्रयोग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगांव मुर्शतपुर शिवारात प्रथमच नागवेली पान लागवडीचा प्रयोग

 कोपरगांव / ता.प्रतिनिधी : शेतीत नाविन्यपूर्ण लागवडीचे प्रयोग केले तर शेतकत्याला त्यातून शिकायला मिळते आणि त्याची आर्थिक उन्नती व्हायला हातभार लागतो,

संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा
अखेर शिक्षकांना मिळणार त्यांच्या हक्काचे पैसे ; बीडीएस प्रणाली झाली सुरू
पथदिवे सुरू करण्यासाठी नागरिकानेच घेतला पुढाकार ; जागरूक करणार मनपासाठी भिख मांगो आंदोलन

 कोपरगांव / ता.प्रतिनिधी : शेतीत नाविन्यपूर्ण लागवडीचे प्रयोग केले तर शेतकत्याला त्यातून शिकायला मिळते आणि त्याची आर्थिक उन्नती व्हायला हातभार लागतो, तालुक्यातील मुर्शतपुर येथील विक्रांत रासकर या प्रयोगशील शेतकऱ्याने नागवेली (पान) लागवडीचा तालुक्यात सर्वप्रथम प्रयोग केला असुन तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे प्रमुख शास्त्रज्ञ संजीव पाटील, कृषितज्ञ पोपटराव खंडागळे यांचे मार्गदर्शन या शेतकऱ्याला  मिळाले आहे. 
           कोपरगांव तालुका राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रात राज्यात नावाजलेला आहे. येथील शेतकरी ध्यासपूर्ण व नाविन्य अत्याधुनिकता मानुन शेती करणारे आहेत. पोहेगांव येथील कृतीशिल शेतकरी स्वःशामराव औताडे या शेतकऱ्यांने एकरी ११७ मे टन उसाचे उत्पादन घेतले होते, मुर्शतपुर येथील रामदास शिंदे या शेतकऱ्याने फुले विक्रम जातीच्या हरभरा पीक उत्पादनात तालुक्यात सर्वप्रथम हेक्टरी  25 क्विंटल सर्वाधिक उत्पादन घेतले,तर संवत्सर येथील प्रगतशिल शेतकरी राजेंद्र भाऊसाहेब शिंदे या शेतकऱ्यांने एकरी २० क्विंटल सोयाबीनचे सर्वाधीक उत्पादन घेऊन तालुक्यात नावलोकिक मिळविलेला असून कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी सतत जाणीवपूर्वक  प्रयोग करत असतात. असाच नावलौकीक प्राप्त करून ध्यास घेत मुर्शतपूर येथील शेतकरी विक्रांत रासकर हे तयार झाले व त्यांनी आपल्या शेतात नागवेली (पान) लागवडीवर भर दिला आहे. 

COMMENTS