केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी : मुंबईकेंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत नाट्याला एक परंपरा, प

संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला
राऊत-दानवेंच्या अडचणी वाढणार ?
राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24

प्रतिनिधी : मुंबई
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत नाट्याला एक परंपरा, पावित्र्य असून त्यात एक सत्यता असते. मराठी नाटकाला प्रतिष्ठा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

कालपासून ज्या काही नाट्यमय घडामोडी सुरू आहेत किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

अशा प्रकारचे आरोप करून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून केले जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर राज्य सरकारनं केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र भाजपमधील नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या सूचनेनुसार माझ्यावर कारवाई झाली. मात्र हि कारवाई कायद्याला धरुन नसून, याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले.

किरीट सोमय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही.

आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृह मंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करू नये. मी पूर्ण माहिती घेतली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही.

मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. या कारवाईबाबत मुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती नाही, असा सावध पवित्रा घेत, कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तुमच्याकडे घोटाळ्याचे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत.

त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत आहात.

अशा कृतीमुळे जर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृह मंत्रालय कारवाई करू शकतं. त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही.

मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गृह मंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल, असा सावध पवित्रा संजय राऊत यांनी घेतला.

COMMENTS