Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 12 ही महिने पोलीस मैदान परिसरात भरते वटवाघुळांची शाळा

 बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा शहराला चहू बाजूने जंगलाने व्यापले आहे, आणि या जंगलात विविध जाती प्रजातीचे प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत, त्यातीलच ए

खून्याला व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती कशी?
बैलगाडीच्या “जुवा” आणि कर्मचारी ! 
राष्ट्रीय महामार्ग 361 फ खरवंडी ते नवगण राजुरी वर ब्रम्हनाथ येळम शिवारात भीषण अपघात एक जण जागीच ठार

 बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा शहराला चहू बाजूने जंगलाने व्यापले आहे, आणि या जंगलात विविध जाती प्रजातीचे प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत, त्यातीलच एक सस्तन प्राणी म्हणजे वटवाघुळ. बुलढाणा शहरातील केवळ पोलीस मैदान परिसरातील चार ते पाच झाडांवरच हजारोच्या संख्येने वटवाघुळ आहेत, बुलढाणा शहर किंवा परिसरामध्ये इतरत्र कुठेही वटवाघुळ पाहायला मिळत नाहीत, मात्र गेल्या अनेक वर्षापासून याच परिसरातील झाडांवर जणू वटवाघुळांची शाळाच भरते. त्यामुळे नागरिकांनाही आश्चर्यच वाटते. हा प्राणी निर्जन स्थळी, मंदिरे किंवा जुन्या इमारती वर पाहायला मिळतो, वटवाघुळाला पंख असल्याने तो पक्षी असल्याचा अनेक जणांचा समज आहे, मात्र हा सस्तन प्राणी आहे, आणि त्याच्यापासून मानवाला प्रत्यक्ष नुकसान होत नसले तरी मात्र त्याच्या विष्ठे पासून अनेक त्वचारोग जडण्याची शक्यता असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे… परंतु या परिसरामध्ये पहिल्यांदाच गेलेल्या व्यक्तीला वटवाघुळाची शाळा पाहिल्या नंतर आश्चर्याचा धक्का नक्कीच बसल्याशिवाय राहत नाही.

COMMENTS