कुणाचा काय अहंकार ते नंतर पाहू… बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही हे भाजपने स्पष्ट करावे…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुणाचा काय अहंकार ते नंतर पाहू… बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही हे भाजपने स्पष्ट करावे…

प्रतिनिधी : मुंबईबेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे

विरोधकांनी बळी देण्यासाठी उम्मेदवार दिला त्यामुळे भाजपचाच विजय निश्चित-आ. फुंडकर 
उद्घाटन होवून देखील रेल्वे न आल्याने अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड.
पावसाचे पाणी साठवा-विषयक कार्यशाळा उत्साहात

प्रतिनिधी : मुंबई
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे,

अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांचा समाचार घेतला होता. आता फडणवीसांच्या या टीकेला पुन्हा संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले .

भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू.

मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असे ट्विट राऊत यांनी केले .

दरम्यान बेळगाव महापालिका निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला . महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपने बेळगाव महापालिका ताब्यात घेतली.

या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. यावरून शिवसेनेने आज सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे .

मराठी एकजूट व मऱ्हाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे; पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच

महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारं आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला, असे शिवसेनेने म्हटले.

COMMENTS