रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करून जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन गुन्हे शाखेच्या एका पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक निलंबित; अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनही
पुणे/ प्रतिनिधी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करून जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन गुन्हे शाखेच्या एका पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीपक माने असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
माने हा गुन्हे शाखेच्या युनिट 4 मध्ये सध्या कार्यरत होता. पोलिस आयुक्तांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाइकांशी ओळख झाली. माने हा 20 एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाइकांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत त्याने या नातेवाइकांच्या लहान मुलीबरोबर अश्लिल वर्तन करून तिची छेडछाड केली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली. याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने माने याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. माने यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
COMMENTS