कशेडी घाटातील चोळई येथे धुवाधार पावसामुळे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबे यातील सुमारे
कशेडी घाटातील चोळई येथे धुवाधार पावसामुळे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबे यातील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्या मंदिर(Vidya Mandir) पोलादपुर येथे हलविले आहे.सदर ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा भाग पावसामुळे दगड माती खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे . यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई,(Sameer Desai) पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव ,(Prashant Jadhav) नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे (Ramdas Kalambe) यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
COMMENTS