अरे बापरे…ते 19 पोलिस सेवेत असून गायब…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरे बापरे…ते 19 पोलिस सेवेत असून गायब…

पोलिस प्रशासनाने सुरू केला शोध, कारवाई करण्याचेही नियोजनअहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा पोलिस दलाच्या सेवेत ते आहेत, नियमित पगारपण घेतात. पण नियुक्तीला कोठे

सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचे व्रत प्रेरणादायी
गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…
पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या… | DAINIK LOKMNTHAN

पोलिस प्रशासनाने सुरू केला शोध, कारवाई करण्याचेही नियोजन
अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा पोलिस दलाच्या सेवेत ते आहेत, नियमित पगारपण घेतात. पण नियुक्तीला कोठे आहेत, हे कोणालाही माहीत नाही. हा धक्कादायक प्रकार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या तपासणीत आढळून आला असून, त्यांनी या सेवेत असून, बेपत्ता असलेल्या 19जणांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जिल्ह्यात 104 पोलिसांची नियुक्ती करणार असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये जे पोलिस दलामध्ये कार्यरत होते व ते गेल्या अनेक वर्षापासून कामावर हजर नाहीत, अशांची संख्या 19 आहे. ते नेमके कोण आहेत, त्यासंदर्भातील माहिती लवकरच एकत्रित केली जाणार आहे व त्यासंदर्भात पुढील कारवाई सुद्धा केली जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. नगर जिल्हा पोलिस दलामध्ये आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून 104 जण नियुक्त केले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया या आठवड्यामध्ये सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अधीक्षक पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची शहानिशा केल्यानंतर नवीन एकशे चार जणांना जिल्ह्यामध्ये येण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यांची नियुक्ती रिक्त पदांवर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य जिल्ह्यात काम करीत असलेले 119 जण नगर जिल्ह्यात येऊन काम करण्यास तयार आहेत. अशा 167जणांपैकी मध्यंतरी 33जणांना सामावून घेण्यात आले आहे. आता नव्याने 104जणांना जिल्ह्यातील रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील रिक्त जागांवर त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया केल्यानंतर त्यांना ते सध्या ज्या जिल्ह्यात काम करतात, तेथून सोडले जाणार आहे. अशा अन्य जिल्ह्यांतून आलेल्यांची वरिष्ठता पाहून त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नगर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाऊ इच्छिणारांमध्ये कोणीही नाही तसेच ते जेथे जाऊ इच्छितात, तेथील रिक्त जागांच्या उपलब्धतेचाही विषय असतो. पण सध्यातरी जिल्ह्यातून कोणी बाहेर जाऊ इच्छित नाही, असे त्यांनी सांगितले. बाहेरून आलेल्यांना जिल्ह्यात नियुक्त्या देत असतानाच या आठवड्यापासून पोलिस कर्मचार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन लाखाचा दंड वसूल
नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे. गेल्या आठवड्यापासून ही कारवाई मोहीम सुरू झालेली आहे. रविवारी दोन लाख दहा हजार रुपयांचा दंड एकाच दिवशी वसूल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ही कारवाई पुढे चालू ठेवली जाणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाविषयक नियम व अटींचे पालन केले पाहिजे. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच जिल्हाभरामध्ये अशा प्रकारच्या मोहिमा सर्वत्र सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS