Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणे पडले महागात

वांबोरीत तरुणास टवाळखोरांनी केली बेदम मारहाण

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः मुलींची छेड काढुन त्रास का देतो याचा जाब विचारला म्हणून सुमारे 15 तरूणांनी एका जणाला काठी, बेल्ट, लोखंडी फायटर व लाथा

एकनाथ शिंदेंचा राजकीय भूकंप… वैचारिक कि आर्थिक ! | LOK News24
कोल्हापूरची रेश्मा व नाशिकचा हर्षवर्धन…कुस्तीचे गदाधारी
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हिंदूद्रोही : आ. राणेंची टीका

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः मुलींची छेड काढुन त्रास का देतो याचा जाब विचारला म्हणून सुमारे 15 तरूणांनी एका जणाला काठी, बेल्ट, लोखंडी फायटर व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे  घडली.संतप्त नातेवाईकांनी आमच्याच गावातील मुलीची छेड काढुन उलट आम्हालाच मारहाण होत असेल तर उलटा चोर कोतवाल को डाटे अशी आवस्था झाल्याने राहुरीची कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा सवाल केला आहे.
         याबाबत सविस्तर माहिती आशी की, गणेश किसन भिटे, वय 33 वर्षे, रा. पुलवाडी वांबोरी, ता. राहुरी. यांनी आरोपी महेश धनवडे याला मुलींची छेड काढुन त्रास का देतो या बाबत जाब विचारला. त्यावेळी आरोपी धनवडे याने तू कोण विचारणार?तुझ्या मुलीची छेड काढली का?असा सवाल करुन मला ओळखत नाही का? गावात यायचे बंद करून टाकीन. परत माझ्या नादी लागला तर मुलगीच कायमची गायब करुन टाकीन. अशी धमकी दिली. आणि इतर मिञांना फोन करुन बोलावून घेतले. सुमारे 15 ते  17 तरुणांनी गणेश भिटे यांना लाकडी काठी, बेल्ट, लोखंडी फायटर व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागला तर डोक्यात दगड घालीन अशी धमकी दिली. छेड काढणार्‍या तरुणांच्या मारहाणीत गणेश किसन भिटे यांना जबरदस्त मार लागल्याने त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी  गणेश अनिल कुसमुडे,अनिल राधाकीसन धनवडे, उमेश मच्छिंद्र कुसमुड़े,बिपीन उर्फ बंटी सुदाम कुसमुडे, ऋषी बाळासाहेब सुपारे, स्वप्नील विजय गुंजाळ, रुपेश विलास गुंजाळ व अनोळखी आठ ते दहा अशा एकूण 15 ते 17 तरुणांविरोधात गुन्हा रजि. नं. 419/2023 भादंवि कलम 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे जबरदस्त मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वांबोरी पोलीस चौकीचे पोलिस करीत आहे.

COMMENTS