करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना किराणा वाटप

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना किराणा वाटप

कोपरगाव तालुक्याचा प्रथम महिला आमदार व भारतीय जनता पार्टी च्या सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे आणि अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील दिव्यांगांना गृहपयोगी अत्यावश्यक वस्तू च्या किराणा किट चे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवराय कल्याणकारी राजे होते – आ.आशुतोष काळे
पोहेगाव पतसंस्थेला 2 कोटींचा नफा – नितीनराव औताडे
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्याचा प्रथम महिला आमदार व भारतीय जनता पार्टी च्या सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे आणि  अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक  विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तालुक्यातील  करंजी ग्रामपंचायत च्या वतीने  गावातील  दिव्यांगांना गृहपयोगी अत्यावश्यक वस्तू च्या  किराणा किट चे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील दिव्यांग बांधवांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येते या वर्षी देखील गावातील नोंदणीकृत ३० दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किराणा वस्तूच्या किट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे  संचालक भास्कर भिंगारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन, सरपंच छबुराव आहेर, उपसरपंच रवींद्र आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य संजय आगवन,  अमृत संजीवनी चे संचालक देविदास भिंगारे, भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सचिव गणेश शिंगारे, तालुका शेतकरी संघाचे संचालक अरुण भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ फापाळे, शिवाजी करंजकर, बाळासाहेब भिंगारे, अनिल डोखे, माजी सरपंच लक्ष्मण शेळके, सामाजिक कार्यकर्ते गोरख भिंगारे, नारायण आगवन, डॉ चंद्रकांत पवार, बाबासाहेब कापसे, करंजी  ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड, भाजपा दिव्यांग सेल चे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष संदीप शहाणे आदी ग्रामस्थ  उपस्थित होते.
   या वेळी गावातील दिव्यांग बांधवांनी सरपंच व उपसरपंच यांचा किराणा किट चे वाटप  केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी  उपसरपंच रविंद्र आगवन यांनी बोलतांना सांगितले की, आजपर्यंत  आपल्या करंजी ग्रामपंचायतीने सर्वांना सोबत घेत गावाच्या विकासासाठी सर्वसमावेशक विविध योजना राबविल्या आसुन या पुढे देखील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचून त्या परिपूर्ण अंमलात आणण्याचे कार्य या पुढे देखील ग्रामपंचायत असेच जोमाने करत राहील असे आश्वासन उपसरपंच आगवन यांनी दिले.    या कार्यक्रमाचे आभार व स्वागत ग्रामविकास अधिकारी गुंड यांनी मानले.

COMMENTS