ओळख पत्र असल्याशिवाय भाजीपाला मार्केट मध्ये प्रवेश दिला जाणार नाही – नामदेव ठोंबळ

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

ओळख पत्र असल्याशिवाय भाजीपाला मार्केट मध्ये प्रवेश दिला जाणार नाही – नामदेव ठोंबळ

सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर शहर हे खडडेमुक्त करा
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्युचा सापळा ! l LokNews24
वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी

कोपरगांव शहर प्रतिनिधी:- सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदगनर यांच्या आदेशानुसार रात्री ८ ते सकाळी ७ वा पर्यंत जमावबंदी लागु करण्यात आली आहे. भाजीपाला लिलावासाठी येतांना आपले आधारकार्ड व ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहेत ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा अनोळखी व्यक्तींना भाजीपाला मार्केट मध्ये प्रवेश दिले जाणार नाही अशा सुचना कोपरगांव सहाय्यक निबंधक तथा प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव नामदेव ठोंबळ यांनी सर्व भाजीपाला शेतकरी व व्यापारी खरेदीदार यांना दिले आहे. 
भाजीपाला लिलावाची वेळ पहाटे ५ वाजता असल्यामूळे भाजीपाला कोपरगांव मार्केट मध्ये विक्रिस आणतांना आपल्या बरोबर भाजीपाला व आपले आधारकार्ड जवळ असणे जरूरीचे आहे. जर आपण आधारकार्ड व भाजीपाला जवळ नसतांना शासनाने नियमा विरूध्द विनाकारण फिरतांना आढळल्यास आपणावर कारवाई होऊ शकते. कारवाई होवु नये यासाठी प्रत्येक भाजीपाला आडते व खरेदीदार यांना कोपरगांव बाजार समितीने भाजीपाला खरेदीचे ओळखपत्र दिलेले आहे.प्रत्येकाने आपले ओळख पत्र लावून भाजी मार्केट मध्ये येणे बंधनकारक असून ज्यांचेकडे ओळख पत्र नाही अशा अनोळखी व्यक्तिंना कोपरगांव भाजीपाला मार्केट मध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची गंभिरतेने दक्षता घ्यावी. तसेच शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करुन कोरोना पासून आपला व आपल्या परिवाराचा बचाव करावा. असे आवाहन देखील कोपरगांव सहाय्यक निबंधक तथा प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव नामदेव ठोंबळ यंानी केले आहे.

COMMENTS