Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन बैठक अचानक झाली ऑफलाईन; अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

नाशिकरोड (प्रतिनिधी ) ऑनलाईन होणारी प्रभाग समितीची बैठक अचानक पणे ऑफलाइन करण्यात आली परिणामी ही बैठक आज चांगलीच गाजली या बैठकीत प्रभाग समितीचे सभा

केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुलं !
मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !
Video : किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच

नाशिकरोड (प्रतिनिधी )

ऑनलाईन होणारी प्रभाग समितीची बैठक अचानक पणे ऑफलाइन करण्यात आली परिणामी ही बैठक आज चांगलीच गाजली या बैठकीत प्रभाग समितीचे सभापती प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्रश्नाचा चांगला भडिमार केला नाशिकरोड परिसरात ठीक ठिकाणी झालेले खड्ड्यांचे साम्राज्य साथीचे आजार या प्रश्नावर बैठक चांगलीच गाजली. महापालिकेच्या दुर्गा उद्यान येथील विभागीय कार्यालयात सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली

सभेत आरोग्याचा व खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. सभापतींनी साथीचे आजारांसबंधी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अधिकारी वर्ग काय करतोय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डेंग्यू, मलेरिया, चिकन गुणियाचे रुग्ण वाढत आहे बिटको हॉस्पिटलमध्ये  रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी बेड उपलब्ध नाही  अधिकारी वर्ग झोपा काढतोय का ? असा संतप्त सवाल त्यांनी  उपस्थित केला.

आरोग्य अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांना शहरात किती रुग्णालय आहे याची देखील माहिती नाही आम्ही लोकप्रतिनिधी रस्त्यावर यायला तयार आहे आम्ही जनसेवक आहोत तुम्ही मात्र फक्त फोटोसेशन करता मात्र ग्राउंड वर काम करताना दिसत नाही असे खडे बोल सुनावले. नगरसेवक संतोष साळवे व जगदीश पवार यांनी महापालिकेतील अधिकारी वर्ग हा ठेकेदार पोसण्याचे काम करतोय. हॉस्पिटल मध्ये मेडिसिन तसेच रुग्णांना बेड मिळत नाही बिटको हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब वर्ग आहे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाशिकरोड विभातील सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत आरोग्याचा प्रश्न गंभीरतेने घेण्याच्या सूचना केल्या.  फक्त ठेकेदारांसाठी काम न करता जनतेसाठी काम करा अशा सूचना केल्या. 

सूर्यकांत लवटे यांनी नवीन बिटको हॉस्पिटमधील वास्तव मांडले. नवीन बिटको रुग्णालयात डॉक्टर 50 सिस्टर 100 आणि पेशंट मात्र 20 अशी परिस्थिती आहे त्यातील काही कर्मचारी वर्ग हा जुन्या बिटको रुग्णालयात वर्ग करण्याच्या सूचना केल्या. सभापती प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांनो मस्तीत वागू नका मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही. आम्ही शासन दरबारी तक्रार मांडू पण तुमची मस्ती उतरवू असा दम अधिकाऱ्यांना भरला. तसेच शहरातील खड्ड्यांचा प्रश्न देखील महत्वाचा असून बांधकाम विभागास तात्काळ खड्डे बुजविण्या? चे आदेश दिले. तसेच येत्या गुरुवारी बिटको रुग्णालयाची साफसफाई करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड विभागातील 450 स्वछता कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश सभापतींनी दिले.

यावेळीनगरसेविका मंगला आढाव, रंजना बोराडे,  जयश्री खर्जुल, नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, सुर्यकांत लवटे, जगदिश पवार, , अंबादास पगारे, सुनिल गोडसे, केशव पोरजे, बाजीराव भागवत, पंडित आवारे, संतोष साळवे, अशोक तापडिया विभागीय अधिकारी डाॅ. दिलीप मेनकर, उपअभियंता निलेश साळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळले आदि अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS