शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी: शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार, असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी खासगी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत.
नगर शहरातील खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, तर ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तर मिळत नाहीतच; पण ऑक्सिजन विक्रेत्यांकडून आता ऑक्सिजनचा पुरवठाही थांबला आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही रुग्णालयात आहे. ऑक्सिजन संपला, तर रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार नाही, अशी हतबलता काही हॉस्पिटलचालकांनी रुग्णांच्या नातेवाइकांना बोलून दाखवली. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ऑक्सिजनची 50 टनाची गरज असताना फक्त 22 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता, तोही ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. ऑक्सिजन पुरवठयाबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे; पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्सिजन नसल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाइकांना केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरमधून नगरमधील काही खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा तात्पुरता पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. नगरमधील खासगी कोवीड रुग्णालयांतून केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य सेवा व्हेंषटलेटरवर आहेच पण त्यात सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्राधान्याने पुरवण्याच्या प्रयत्नात खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन मात्र संपण्याच्या मार्गावर आहे. नगर शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनीही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला जाईल व आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती भयानक झाली आहे. शहरात ऑक्सिजनची 60 टनाची गरज असताना फक्त 30 ते 35 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो मागील दोन दिवसांपासून मिळत होता, तोही ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सध्या अडीच हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला आहे, त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहेत. त्यामुळे जे रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार करायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर आहे. आजच्या दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे, आम्ही आता रुग्ण कशा पद्धतीने जगवायचे हाही प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा तात्काळ विचार करून आम्हाला त्वरित ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी ड़ॉ. भोसले यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हा शासकीय रुगणालयात रात्री 12 पर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच नगरमधील खासगी रुग्णालयाच्या ऑक्सिजनचा प्रश्न आता अतिशय गंभीर झाला असल्याने अनेक रुग्ण बुलडाणामधील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले असल्याचीही माहिती मिळाली आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रयत्न ः डॉ. भोसले
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, नगर जिल्ह्यामध्ये काल सोमवारी एकच ऑक्सिजनचा टँकर उपलब्ध झालेला आहे. ऑक्सिजनचे दोन टँकर उपलब्ध होणार आहेत. ते आल्यानंतर खासगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवला जाईल. ज्यांच्याकडे औषधांचा साठा संपत आलेला आहे, त्यांना तात्काळ अन्य जिल्ह्यातून उपलब्ध करून दिला जाईल.
COMMENTS