‘एल़डीएफ’ आणि ‘यूडीएफ’ यांची मॅच-फिक्सींग आहे- नरेंद्र मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एल़डीएफ’ आणि ‘यूडीएफ’ यांची मॅच-फिक्सींग आहे- नरेंद्र मोदी

केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावे वेगळी आहेत.

हिंदू-मुस्लिम बांधवानी रक्तदान करत दिला एकतेचा संदेश
ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना
शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

पलक्कड : केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावे वेगळी आहेत. दोन्ही आघाड्यांमधील मॅच फिक्सिंग हे केरळच्या राजकारणातील सर्वात वाईट रहस्य असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या प्रचारासाठी पलक्क़ड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

केरळ विधानसभा निवडणुकीत एलडीएफ, यूडीएफ आणि एनडीए अशी तिरंगी लढत होतेय. त्यासाठी तिन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. एनडीए उमेदवारी ई. श्रीधरन यांच्या प्रचारसभेत पंतप्रधआन मोदी यांनी एलडीएफवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी गोल्ड स्मगलिंग स्कॅन्डलचा त्यांनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की, “जूडासने चांदीच्या काही नाण्यांसाठी लॉर्ड क्राइस्टचा विश्वासघात केला होता. तशाचप्रकारे एलडीएफने देखील सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला.” असा टोला पंतप्रधानांनी लगावला. “अनेक वर्षांपर्यंत केरळच्या राजकारणाचे सर्वात वाईट रहस्य हेच आहे राहिले आहे की, यूडीएफ आणि एलटीएफ यांच्यात मैत्रीपूर्ण करार होता आता, पहिल्यांदा केरळमध्ये मतदार विचार आहे की, ही काय मॅच फिक्सिंग आहे ? एकजण पाच वर्षांपर्यंत लुटतो, त्यानंतर दुसरा पाच वर्षे लुटतो. दोन्ही आघाड्यांनी पैसे कमवण्यासाठी विविध भाग बनवून ठेवले आहेत. यूडीएफने तर सूर्याच्या किरणांना देखील सोडले नसल्याची टीका मोदींनी केली.

COMMENTS