एमपीएससीच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार : अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमपीएससीच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार : अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याने पडसाद सोमवारी विधीमंडळात उम

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांच्या वयोमर्यादेत वाढ
सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव !
एमपीएससी मायाजाल; विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याने पडसाद सोमवारी विधीमंडळात उमटले. याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची घोषणा केली आहे.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकार्‍यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली, असे अजित पवार यांनी सांगितले. मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचे की, स्वप्निल लोणकर याने 2019 मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला. या परीक्षेत 3,671 उमेदवार पात्र ठरले. 12,00 पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितले, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली.

एसईबीसी प्रवर्गाच्या वयोमर्यादेत वाढ
राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणार्‍या उमेदवारांची मयोवर्यादा 43 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. एसईबीसी अंतर्गत येणार्‍या उमेदवारांची मयोवर्यादा 43 पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली आहे असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

COMMENTS