‘एमआयडीसी’चा सर्व्हर हॅक; 500 कोटींची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एमआयडीसी’चा सर्व्हर हॅक; 500 कोटींची मागणी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महावितरणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवक्त्याच्या कानशिलात भडकावली | LokNews24
ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर हॅकर्सने तब्बल 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील संपूर्ण महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकी देण्यात आली आहे.

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडल्याची माहिती मिळत आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. या सिस्टिममध्ये प्रवेश केल्यास डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली आहे. एमआयडीसी सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. हॅकर्सचा शोध सुरु असल्याचे समजते.

COMMENTS