एनआयए परमबीर सिंग, वाझेंना वाचवते का? ; सचिन सावंत यांचा सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनआयए परमबीर सिंग, वाझेंना वाचवते का? ; सचिन सावंत यांचा सवाल

परमबीर सिंग पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयाचा डीव्हीआर गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या 18 दिवसापासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकार्‍याचा जबाब घेतला नाही, हे आश्‍चर्याचे आहे.

अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…
एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने महिलेचा मृत्यू
मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून

मुंबई/प्रतिनिधी: परमबीर सिंग पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयाचा डीव्हीआर गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या 18 दिवसापासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकार्‍याचा जबाब घेतला नाही, हे आश्‍चर्याचे आहे. हा डीव्हीआर गायब करण्यामागे सिंग यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल तर राज्य सरकारने ती चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.  

ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दहा 10 मार्च रोजी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरित्या ताब्यात घेतला; परंतु दोनच तासामध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली असे लक्षात आल्याने एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना सिंग यांच्या कार्यालयातून फोन गेला, हा फोन कोणी केला हे स्पष्ट आहे व चौकशीअंती समोर येईल; परंतु या डीव्हीआरमध्ये स्पष्ट दिसत नाही असे कारण देऊन तो नंतर तपासून परत देऊ, असे म्हणत डीव्हीआर परत मागवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सिंग यांच्या कार्यालयामधून अधिकृतपणे अधिकार्‍याला पाठवून तो ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर हा डीव्हीआर गायब झाला आहे. एनआयए याची चौकशी का करत नाही, असा सवाल सावंत यांनी केला. या डीव्हीआरमध्ये स्कॉर्पिओ, इनोव्हा गाड्यांची मूव्हमेंट, वाझे व इतर जण कोणाच्या संपर्कात होते हे स्पष्ट दिसत होते, असे सावंत यांनी म्हटले.

COMMENTS