HomeUncategorized

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजारामबापू व हुतात्मा कारखान्यावर रॅली

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी नागपूरमध्ये पेपर
प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी होणार साडेतीनशे रुपयांत : आरोग्यमंत्र्यांची माहिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखाना व हुतात्मा किसन आहिर कारखान्यावर मोटारसायकल रैली काढून साखर कारखान्यांस निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले, शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. अशा स्थितीत सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन तोडतुन ब्र शब्द काढायला तयार नाहीत. लवकरच एकरकमी एफआरपी जाहीर करण्यात यावी. अन्यथा संघर्ष अटळ आहे, सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरकमी जाहीर करावी. यावेळी टोळीला द्यावी लागणारी पैशाची पध्दत बंद करावी. पुरबाधित ऊस तोडणी प्रथम प्राधान्याने तोडीणी करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, राजाभाऊ पाटील, प्रकाश देसाई, शहाजी पाटील, तानाजी साठे, पंडित सपकाळ, भैरवनाथ कदम, प्रताप पाटील, भुजंग पाटील, निखिल कारंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS