उमरखेड बस दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरखेड बस दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर

प्रतिनिधी : नांदेड उमरखेड ते पुसद रोड वरील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या नांदेड - नागपूर या बसमधील मयत प्रवाशांच्या नातेवाईकांना खासदार हे

Nanded : जिल्हापरिषद शाळेमध्ये चालतो मटका व दारूचा व्यवसाय (Video)
Nanded : नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले !
Nanded : गर्भवती महिलेस महिला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण (Video)

प्रतिनिधी : नांदेड

उमरखेड ते पुसद रोड वरील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या नांदेड – नागपूर या बसमधील मयत प्रवाशांच्या नातेवाईकांना खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उमरखेड – पुसद रोडवरील नाल्याला आलेल्या पुरात राज्य परिवहन महामंडळाची नांदेड – नागपूर ही हिरकणी बस दि. 28 रोजी वाहून गेली होती.  या घटनेची तात्काळ दखल घेत हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन  बचाव व मदत कार्यास सुरुवात केली.

    अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर नाल्याला आलेल्या  पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बसमधील शरद नामदेव फुलमाळी व सुब्रम्हण्यम सूर्यनारायण टोकला या दोन प्रवाशांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर बसवाहक भिमराव लक्ष्मण नागरीकर, चालक सुरेश रंगाप्पा सुरेवार, नागपूर तर प्रवासी शेख सलीम उर्फ बाबू शेख इब्राहिम रा. वारा, आणि  इंदल रामप्रसाद महिंद्रे रा. कारोळा ता. पुसद या  चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.  बसमधील एक प्रवासी अद्याप बेपत्ता आहे.

    या सर्व कालावधीत खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः दिवसभर घटनास्थळी ठाण मांडून मदत व बचाव कार्यात भाग घेतला तसेच जिल्हा प्रशासनास निर्देश दिले.

     बसमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्याशी  दिवसभर सतत संपर्क साधून त्यांना अपघाताविषयी अवगत केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारकडून परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे  मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

COMMENTS