आरोग्य भरती परीक्षेचा नियोजनाचा उडाला बोजवारा ; ऐनवेळी पुणे, नाशिक केंद्रावर प्रश्‍नपत्रिकांची टंचाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य भरती परीक्षेचा नियोजनाचा उडाला बोजवारा ; ऐनवेळी पुणे, नाशिक केंद्रावर प्रश्‍नपत्रिकांची टंचाई

पुणे/प्रतिनिधी- आरोग्य विभागाच्या भरतीला लागलेले ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा पुढे

अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक
करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 
महावितरणच्या उत्कृष्ठ उपविभाग पुरस्काराने मेढा उपविभागाचा सन्मान

पुणे/प्रतिनिधी- आरोग्य विभागाच्या भरतीला लागलेले ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी परीक्षेची तयारी पूर्ण न झाल्यामुळे ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती, त्यानंतर उमेदवारांच्या हॉलतिकीटांवर वेगवेगळे केंद्र आल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप झाला होता. त्यानंतर रविवारी महाराष्ट्रात विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडल्या असल्या तरी पुणे, नाशिकमध्ये प्रश्‍नपत्रिकांची टंचाई निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला.
नाशिकमधील गिरणारे येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित उमेदवारांपेक्षा कमी प्रश्‍नपत्रिका आल्या. पुण्यातल्या केंद्रावरही हा प्रकार घडला. त्यामुळे ही आधीच गोंधळावरून गाजलेली भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर पेपरची वेळ झाली तरी प्रश्‍नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या, अशा तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. प्रश्‍नपत्रिका तर नाहीतच शिवाय पर्यवेक्षकही उपस्थित नव्हते, अशी माहिती आहे. त्यामुळे तेथे विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिकमध्ये गिरणारे केंद्रावर 450 उमेदवार परीक्षा देणार असताना प्रश्‍नपत्रिका मात्र 300 आल्याने एकच गोंधळ उडाला. काही विद्यार्थ्यांकडे त्यांचे ओळखपत्रही नीट नव्हते. नाशिक मंडळात साधारणत: 430 पदांसाठी ही परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात प्रथम सत्रात 18 हजार 87, तर द्वितीय सत्रात 18 हजार 183 उमेदवार परीक्षा देणार आहेत. गट क संवर्गाची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. विविध 52 प्रकारच्या पदांसाठी ही परीक्षा होत असून, सकाळच्या सत्रात 25, तर दुपारच्या सत्रात 27 प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा संताप
पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका मिळाल्या आहेत. तर, काही जणांना प्रश्‍नपत्रिका मिळालेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावे लागते. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्यार्‍यांनी तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचे म्हटले.

COMMENTS