पुणे/प्रतिनिधीः देशभरातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरींचे सात कंपन्यांमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णयाविरोधात संरक्षण कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उगारण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ एक जुलै रोजी संपाची नोटीस देण्यात येणार असून, 19 जुलैपासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन (एआयडीईएफ), इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन (आयएनडीडब्लूएफ) आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (बीपीएमएस) या संरक्षण कर्मचार्यांच्या प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींची रविवारी ऑनलाइन बैठक झाली. ऑर्डनन्स फॅक्टरींचे व्यवसायिकरण करण्याच्या निर्णयाविरोधात अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा आणि कायदेशीर लढा देण्याचा निर्धार संघटनांनी केला. देशात एकूण 41 ऑर्डनन्स फॅक्टरी त्यापैकी तीन पुणे परिसरात आहेत. ’ऑर्डनन्स फॅक्टरी सात कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये विभागण्याचा केंद्र सरकारचा निर्णय देशहिताचा नाही. याचा परिणाम संरक्षण कर्मचार्यांच्या नोकर्यांवर आणि देशाच्या सुरक्षिततेवर होईल. यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संजय मेनकुदळे यांनी सांगितले.
COMMENTS